कामावर हजर होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांची संख्या रोडावली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 8, 2022

कामावर हजर होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांची संख्या रोडावली.

 कामावर हजर होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांची संख्या रोडावली.

खाजगी वाहतूक जोमात.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा बर्‍याच ठिकाणी ठप्प झाली आहे. आज अखेरपर्यंत एसटीचे 1157 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सध्या जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील काही बसस्थानकांमध्ये खासगी वाहने प्रवासी घेत आहेत. त्याचा फटाका आगामी काळात एसटीला बसणार आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण एक हजार 157 कर्मचारी विविध आगारांमध्ये कामावर हजर झाले. यामध्ये प्रशासकीय 363, यांत्रिकी 380, चालक 182, वाहक 219, चालक तथा वाहक 13 कामावर हजर झालेले आहेत.
एसटीच्या कर्मचार्‍यांनी संप सुरू करून सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. कर्मचार्‍यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांनी तातडीने कामावर हजर होणे गरजेचे होते. मात्र, कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. हा कारवाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या रास्त असल्या, तरी त्यांनी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळून आता कामावर हजर होणे गरजेचे असतानाही संप सुरू ठेवला आहे. त्यामुळे प्रवासीही वैतागले असून, आता राज्य सरकारनेही संप मिटविण्याची घाई करू नये, तसेच कर्मचार्‍यांनीही मागणी मान्य होईपर्यंत कामावर येऊ नये, आम्ही आमची सोय करू, असा उपरोधिक संदेश प्रवाशांमधून व्हायरल केला जात आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. एसटी कर्मचार्‍यांची मागण्या जरी योग्य असल्या, तरी प्रवाशांचेही हीत कर्मचार्‍यांनी पाहणे गरजेचे आहे. या संपामुळे खासगी वाहतुकदारांनी सर्वसामान्यांची लूट केलेली आहे. त्यामुळे एसटीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. एसटी प्रशासनाने आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण 222 जणांवर बडतर्फची कारवाई केली असून, 303 जणांचे निलंबन करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment