शहरातील एका संस्थेने वेश्यांसाठी आलेले अनुदान लुटले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 8, 2022

शहरातील एका संस्थेने वेश्यांसाठी आलेले अनुदान लुटले.

 शहरातील एका संस्थेने वेश्यांसाठी आलेले अनुदान लुटले.

आरपीआय आठवले गटाची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरात एड्स बाधित व वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांच्या पुनर्वसनाचे काम करणार्‍या एका संस्थेने केंद्र शासनाकडून 15 हजार रुपये अनुदान लाटण्यासाठी सर्वसाधारण महिला व मुलींची नावे यादी टाकून अपहार केल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे करत या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शहरात एड्स बाधित व वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांसाठी कार्य करणार्‍या एका संस्थेला कोरोनाच्या टाळेबंदीत वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांसाठी केंद्र शासनाकडून प्रत्येकी 15 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले होते. या अनुदानात घरगुती सर्वसाधारण महिला, लहान मुली, ज्यांच्या वेश्याव्यवसायाशी कुठलाही संबंध नाही अशा महिलांची नावे वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. याबाबत पुरावे देखील जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले असून, या घोटाळ्याबाबतचे कागदपत्र कोणाला देऊ नये, यासाठी संबंधित संस्थेकडून दबाव आणला जात आहे.
या संस्थेच्या कर्मचार्‍यांकडून जीवितास धोका असून, सदर व्यक्ती रात्री फोन करुन धमक्या देत असल्याचे महिलेने तक्रार अर्जात म्हंटले आहे.वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांची नावे अनुदानाच्या यादीत टाकण्यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत. सदर यादीमध्ये दहा वर्षाच्या मुली पासून ते वयस्कर महिला, घरगुती महिला यांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित अनुदानाचे पूर्ण वाटप करण्यात आलेले नसल्याचा आरोप तक्रारदार महिला व आरपीआयच्या वतीने करण्यात आला असून, सदर प्रकरणी चौकशी करुन तक्रारदार महिलेला संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आरपीआयचे माजी शहराध्यक्ष नाना पाटोळे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष बंटी भिंगारदिवे, अतुल भिंगारदिवे, विलास साळवे, संदीप आहेर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment