उच्च न्यायालयाकडून लैंगिक छळ प्रकरणासंबंधीत मार्गदर्शक तत्त्वे जारी, पीडितेबद्दल आणखी गुप्तता पाळणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 30, 2021

उच्च न्यायालयाकडून लैंगिक छळ प्रकरणासंबंधीत मार्गदर्शक तत्त्वे जारी, पीडितेबद्दल आणखी गुप्तता पाळणार

 उच्च न्यायालयाकडून लैंगिक छळ प्रकरणासंबंधीत मार्गदर्शक तत्त्वे जारी, पीडितेबद्दल आणखी गुप्तता पाळणार

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित प्रकरणांचे मीडिया रिपोर्टिंग बंद केले आहे. उच्च न्यायालयाने अशा केसेसमध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. त्यामुशे आत अशा बाबतीतली सुनावनी न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये किंवा त्यांना दिलेल्या खोलीत केली जाईल. त्यामुळे अशा संबंधातील बातमी ऑनलाईन किंवा हायब्रीड होणार नाही.
न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने कामाच्या ठिकाणी महिलांशी संबंधीत प्रकरणांच्या मीडिया रिपोर्टिंगचे नाव प्रकाशित आणि प्रसारित करू नये असे निर्देश दिले. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्यास त्या व्यक्तीचे नाव आणि त्या कंपनीची ओळख गुप्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जेव्हा पक्षकारासंबंधीत काही बोलायचे असेल तर, त्याला दिलेल्या संख्येने त्याला बोलावले जाईल. जर ऑर्डर सार्वजनिक क्षेत्रात प्रलंबित असेल तर न्यायालयाच्या विशेष आदेशाची आवश्यकता असू शकते.  तसेच या केसशी संबंधीत कोणाचाही फोन नंबर, इमेल आयडी किंवा अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख केला जाणार नाही, असे ही न्यायालयाने सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here