सावेडी मनपा कार्यालयातील कर्मचार्‍यांचा व्हिडिओ व्हायरल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 8, 2022

सावेडी मनपा कार्यालयातील कर्मचार्‍यांचा व्हिडिओ व्हायरल.

 सावेडी मनपा कार्यालयातील कर्मचार्‍यांचा व्हिडिओ व्हायरल.

ऑडिओ.. व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रकरणात वाढ.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यात आणि शहरात सध्या काही वादग्रस्त व्हिडीओ, ऑडिओ क्लिप व्हायरल होण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. कधी पोलिसांच्या देवाण घेवणीचे ऑडिओ व्हायरल झालेत तर कधी हनीट्रॅपचे व्हिडिओ तर तथाकथित पत्रकारांच्या फुकट जेवणाचे ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मध्ये आता आणखी एक भर पडली असून अहमदनगर शहराच्या समस्या सोडवणार्‍या सावेडी मनपा कार्यालयातील एका कर्मचार्‍याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओ मध्ये दोन जणांचा संवाद स्पष्ट ऐकू येत असून काही रक्कम देवाण घेवाण होत आहे. रक्कम कशासाठी घेतली याचे कारणही स्पष्ट ऐकू येत आहे.रक्कम देणारा माणूस हात जोडून पैसे देत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येतय. मनपा कार्यालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामाने चर्चेत असते आर्थिक भ्रष्टाचारावरून काही अधिकारी लाच लुचपतच्या जाळयात अडकले आहेत. तर दोन दिवसांपूर्वी एक अधिकारी निलंबित झाला आहे. मनपा कार्यालयातील कामकाजा बाबत आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप लोकप्रतिनिधीसह नागरिक नेहमीच करत असतात. मात्र अद्याप पर्यंत असा व्हिडीओ कधी व्हायरल झाला नव्हता मात्र आता व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
रक्कम कशासाठी घेतली-दिली जात आहे याबाबत अजून काही माहिती नसली तरी देणारा माणूस हात जोडून पैसे देत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. मनपा कार्यालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामाने चर्चेत असते. मात्र अद्याप पर्यंत असा व्हिडीओ कधी व्हायरल झाला नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र आता एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे हा व्हिडीओ विशेषतः ’सावेडी’त चांगलाच चर्चेत आला असल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment