ओंकार भागानगरे खून प्रकरणी तीन संशयित अटकेत..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 22, 2023

ओंकार भागानगरे खून प्रकरणी तीन संशयित अटकेत..!

  ओंकार भागानगरे खून प्रकरणी तीन संशयित अटकेत..!


अहमदनगर -
अवैध धंद्याची तक्रार दिल्याच्या कारणावरून ओंकार उर्फ गामा भागानगरे याचा खून केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तीनही प्रमुख आरोपी अद्याप फरार आहेत. मात्र, या प्रकरणी वैभव हुच्चे, रवि नामदे व सागर गुडा या तीन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरा तोफखाना पोलिसांनी त्यांच्या अटकेची कारवाई पूर्ण केली.
दरम्यान, मुख्य आरोपींचा शोध सुरू असून, तीन पथके रवाना करण्यात आली आहेत, लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
हल्ल्यापूर्वी मयत ओंकार उर्फ गामा भागानगरे, जखमी शुभम पडोळे व फिर्यादी ओंकार घोलप यांच्यावर पाळत ठेऊन त्याची माहिती आरोपींना पुरवणार्‍या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. दाखल गुन्ह्यातील तीनही प्रमुख आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

No comments:

Post a Comment