पारनेर बसस्थानक आवारात युवकाची अलिशान गाडीच्या टपावर बसून धूम २ स्टाईल.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 11, 2023

पारनेर बसस्थानक आवारात युवकाची अलिशान गाडीच्या टपावर बसून धूम २ स्टाईल..

 पारनेर बसस्थानक आवारात युवकाची अलिशान गाडीच्या टपावर बसून धूम २ स्टाईल..


पारनेर -
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर आगार परीसरात शहरातील व परिसरातील धनधांडगे त्यांच्या आलिशान गाड्या विना परवाना प्रवेशद्वरावरच लावत असल्याने महामंडळाच्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे धनधांडगे स्थानिक प्रशासनाला अजिबात घाबरत नाहित. पारनेर आगारातील लावलेल्या वाहनावर स्थानिक प्रशासन व पोलीस जाणीव पूर्वक डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच सोमवार दि.११ रोजी दुपारच्या वेळेत एक हिरो चक्क आलिशान गाडी बसस्थानक परिसरात आणून गाडीच्या टपावर बसून बसस्थानक प्रशासनाच्या नाकावर टीच्चून धूम स्टाइल करत असल्याचे चित्र दिसून आले. पारनेर आगार व्यवस्थापक व पारनेर पोलीस  आगारातील कॅमेरा तपासून या धूम स्टाइल हिरोवर कारवाई कारवाई करावी अशी मागणी प्रत्यक्षदर्शी प्रवाशी करत आहेत. तसेच आवारात अवैध वाहने लावण्यास मनाई असताना सुद्धा सर्रास धन धांडगे आलिशान गाड्या परीसरात वाहनांना अडथळा होईल असे वर्तन करतात त्या अलिशान गाड्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामजिक कार्यकर्ते करत आहेत.
सविस्तर माहिती अशी की,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पारनेर आगार परीसरात कायमच खाजगी जागा असल्या सारखे पारनेर शहरातील व परिसरातील अलिशान गाड्यावाले गाड्या अस्ताव्यस्त गाड्या लावत असतात. त्यातच भर सोमवार दि.११ रोजी दुपारच्या वेळेत एक युवक चक्क एका आलीशान गाडीच्या टपावर बसून धूम स्टाइल २ करत असल्याचा प्रकार दिसून आला होता. हा प्रकार चक्क परिवहन विभागाच्या नाकावर टीच्चून करत असल्याने युवकांची ताकत वाढत आहे. या धूम स्टाइल हिरोला पोलीस प्रशासन व पारनेर आगार व्यवस्थापन कॅमेऱ्यातून शोधून काढून या अलिशान गाड्या वाल्यांना धडा शिकवतील का असा प्रश्न सर्व सामान्य प्रवाश्यांना पडत आहे. पारनेर आगार व्यवस्थापक व पोलीस प्रशासन यांनी सर्व सामान्य प्रवाश्यांना सुरक्षा देण्यासाठी प्रामाणिक मागणी करावी अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

No comments:

Post a Comment