शेतकर्‍याच्या जनधन खात्यावर चुकून आले 15 लाख रुपये. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 8, 2022

शेतकर्‍याच्या जनधन खात्यावर चुकून आले 15 लाख रुपये.

 शेतकर्‍याच्या जनधन खात्यावर चुकून आले 15 लाख रुपये.

शेतकर्‍याने या पैशातून घर बांधलं... आता बँक म्हणते पैसे भरा.

बँक प्रशासनाचा भोंगळ कारभार..


औरंगाबाद -
बँकेतील “जनधन खाते” ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रिय योजना आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकर्‍याच्या जनधन खात्यात काही महिन्यांपूर्वी अचानक 15 लाख 34 हजार 626 रुपये जमा होणे हा बँक प्रशासनाचा भोंगळ कारभार असून या पैशातून घर बांधणार्‍या या शेतकर्‍याला खर्च केलेली रक्कम बँकेत जमा करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याची नोटिस आल्यामुळे हा शेतकरी हादरून गेला आहे.
शेतकरी व त्याचं कुटुंब या कारवाईच्या नोटिसीने पुरते हादरून गेलय. वास्तविक यामध्ये या शेतकर्‍याची कोणतीही चूक नाही. त्यांच्या खात्यात बँकेने 15 लाख रुपये जमा केले आणि अनेक महिने त्याबाबत त्यांच्याकडे कोणतीही विचारणा केले नाही. त्यामुळे झालेल्या गोड गैरसमजातून शेतकर्‍यांनी घर बांधलं आणि त्या रकमेचा वापर केला. आता मेटाकुटीला आलेला शेतकरी पुरता हादरून गेला आहे. बँकेची कारवाई नको त्यामुळे त्यांना ती रक्कम बँकेला परत करायची तयारी आहे मात्र केवळ दोन एकर जमीन त्यातही जमिनीत काही पिक व्यवस्थित आलेले नसल्याने उत्पन्नही नाही. त्यामुळे येणार्‍या हंगामामध्ये शेतीतील उत्पन्नातून थोडी-थोडी करून रक्कम मी बँकेला परत करेल असं त्यांनी आता बँकेला कळवल आहे. त्याचबरोबर वापरलेली रक्कम हे कर्जामध्ये रूपांतरित करून त्याचे हप्ते पाडून द्यावे ते मी नियमित भरेल असे सांगितले आहे. याबाबत संबंधित बँकेचा भोंगळ कारभार हा कारणीभूत असून या शेतकर्‍याला अघरासाठी केलेल्या खर्चाबद्दल पैसे कसे फेडायचे या चिंतेने ग्रासले आहे.
आपल्या बँक खात्यात 15 लाखांची रक्कम जमा झाली आणि ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत जाहीरनाम्यात केलेल्या घोषणेच्या बाबत असेल असं ज्ञानेश्वर जनार्दन आवटे या भोळ्याभाबड्या शेतकर्‍याला वाटलं. रक्कम जमा झाल्यानंतर बँकेकडून  त्याबाबत संबंधित शेतकर्‍याला त्यावेळी विचारणा झाली नाही. अर्थातच शेतकरी ज्ञानेश्वर आवटे यांना पक्की खात्री झाली की जनधन खात्यात आलेले रक्कम ही पंतप्रधानांनी केलेल्या वायद्या प्रमाणे आपल्या खात्यात पाठवलेले आहे. शेतकर्‍याचे कुटुंब अगदी आनंदात होते आणि या यामुळे त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपण दिलेले आश्वासन पूर्ण केले आणि माझ्या खात्यात 15 लाख रुपये रक्कम जमा केली याबद्दल त्यांचे आभारही मानणारे पत्रही पाठवले.
त्यानंतर संबंधित शेतकर्‍याला पंतप्रधान कार्यालयाकडून काही उत्तर आले नाही मात्र दरम्यानच्या काळात ज्ञानेश्वर आवटे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याजवळ केवळ दोन एकर जमीन आहे त्यांना राहते घरी नव्हते मात्र आता जनधन खात्यात 15 लाख रुपये जमा म्हटल्यावर त्यांनी त्यातील नऊ लाखावर रक्कम वापरून एक टुमदार असं आपल्या कुटुंबासाठी घर बनवलं. पंधरा लाख रुपये बँकेत येणे काय त्यानंतर स्वतःचं घर बांधून झाल्याने  या आनंदात आवटे कुटुंब समाधानी होते. मात्र डिसेंबर महिन्यात अचानक ज्या बँकेत त्यांना पैसे जमा झाले होते त्या बँकेतून  पत्र आले. त्यात त्यांनी त्यांच्या जनधन खात्यात जमा झालेली रक्कम ही चुकून जमा झाली असून ती रक्कम पिंपळवाडी ग्रामपंचायतीची पंधराव्या वित्त आयोगाची जिल्हा परिषदेकडून आलेली रक्कम असल्याचे त्यांना कळवण्यात आलं. नऊ लाखाच्यावर शिल्लक असलेली रक्कम बँकेने होल्ड करून ठेवले आणि शेतकर्‍याला नोटीस वजा पत्र पाठवून तातडीने वापरलेली रक्कम जमा करा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं बजावलं आहे.

No comments:

Post a Comment