‘द ग्रेट खली’ची राजकारणात एंट्री, भाजपामध्ये केला प्रवेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 10, 2022

‘द ग्रेट खली’ची राजकारणात एंट्री, भाजपामध्ये केला प्रवेश

 ‘द ग्रेट खली’ची राजकारणात एंट्री, भाजपामध्ये केला प्रवेश


नवी दिल्ली ः
पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून येत्या 20 फेब्रुवारीला पंजाबमध्ये मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपाला मोठं ’बळ’ मिळाल्याचं बोललं जात आहे. याला कारण ठरली आहे ती ’दी ग्रेट खली’ म्हणून ओळख असणारा भारतीय व्यावसायिक रेसलर दलिपसिंग राणा याची राजकारणातली एंट्री. खलीनं आज भाजपामध्ये प्रवेश केला असून आत्तापर्यंत विरोधी रेसलर्सला फाईटच्या आखाड्यात चितपट करणारा खली आता राजकीय आखाड्यात भाजपाकडून प्रचार करताना विरोधी उमेदवाराला निवडणुकीत चितपट करण्यासाठी सज्ज झाला आहे! थथए सारख्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळणारा खली त्याची उंची आणि धिप्पाड देहयष्टी यासाठी ओळखला जातो. मात्र, आता हाच दलिपसिंग राणा उर्फ खली पंजाबमध्ये भाजपाकडून प्रचार करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी खलीनं दिल्लीच्या सीमारेषांवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता त्यानं भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आंदोलक शेतकर्‍यांना पाठिंबा देण्याचं आवाहन देखील खलीनं केलं होतं.

No comments:

Post a Comment