शहर व जिल्ह्यात सेक्स रॅकेट चालविणार्‍या ‘त्या’ महिलेची मोबाईल सीडीआर ची तपासणी करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 10, 2022

शहर व जिल्ह्यात सेक्स रॅकेट चालविणार्‍या ‘त्या’ महिलेची मोबाईल सीडीआर ची तपासणी करा.

 शहर व जिल्ह्यात सेक्स रॅकेट चालविणार्‍या ‘त्या’ महिलेची मोबाईल सीडीआर ची तपासणी करा.

फिरोज पठाण यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरात व जिल्ह्यात बेंगलोर, कलकत्ता, पुणे-मुंबई या भागातून मुली मागवून देहविक्रीचा व्यवसाय  करत ही महिला मुली पुरवण्याचे काम करीत आहे.नगरच्या बस स्थानक येथील एका हॉटेल मध्ये तर मांडवगण फाटा येथील एका ढाब्यावर तिने देहविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. तिचे रॅकेट संपूर्ण भारतामध्ये आहे. बेंगलोर, कलकत्ता, पुणे-मुंबई या भागातून महिला देह विक्रीसाठी मागवल्या जातात. या महिलेची चौकशी केल्यास मोठे सेक्स रॅकेट उघडकिस येण्याची शक्यता आहे. सदर महिलेकडून काही पोलीस आर्थिक देवाण-घेवाण करत असल्याने तिच्यावर कारवाई होत नाही. शहर व जिल्ह्यात फोनद्वारे ही महिला अनेकांना मुली पुरवण्याचे काम करते. या रॅकेटमध्ये काही अल्पवयीन मुलींना सुद्धा अपहरण करून आणले जात असून केडगाव येथील त्या महिलेचा पर्दाफाश होण्यासाठी तिच्या मोबाईलची सीडीआर तपासणी करण्याची मागणी फिरोज पठाण याने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर महिलेने 29 हजार रुपयांच्या उधारीपोटी तब्बल 2 लाख रुपये उकळले असून, सदर महिला त्रास देत असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे.
पठाण यांची केडगाव येथील त्या महिलेची ओळख एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयात झाली होती. त्या महिलेशी मैत्री झाल्यानंतर तीचा खरा व्यवसाय समजला.
या महिलेकडून पत्नी आजारी असताना 29 हजार रुपये उसने पैसे घेतले होते. सदर पैसे परत करता आले नाही. माझ्याकडे एका सामाजिक संस्थेत मुख्यमंत्री सहायता निधीतून वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांना आलेल्या अनुदान वाटपासाठी यादी बनविण्याचे काम होते. या महिलेने दिलेले 126 नावे सदर यादीत टाक, नाहीतर माझे पैसे परत द्या. अशी धमकी दिल्याने मी घाबरलो. तिने मला संपूर्ण यादी दिली. सर्व नाव एकसारखी असल्याने ही खोटे नाव टाकण्यास नकार दिला होता. सदर महिलेने त्या सामाजिक संस्थेला देखील ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी देते आहे. त्या महिलेने दिलेल्या उसने पैसे परत करण्यासाठी दागिने, गाडी विकून व उधारी करुन 29 हजारापोटी 2 लाख रुपये दिले. परंतु अद्याप ही महिला त्रास देत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here