युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांना धमकीचे पत्र. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, December 23, 2021

युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांना धमकीचे पत्र.

 युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांना धमकीचे पत्र.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तयारी करू नको, कारण तुझ्या बापाने नगरचा कधीच विकास केला नाही. तू तरी काय करणार. असे म्हणत शिवसेना कार्यकर्ते व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, संग्राम भैय्यांच्या निवडणुकीत पडला तर तुझ्या सकट सगळ्यांचा काटा काढू.अशा धमकीचे पत्र स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे पुत्र शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी अज्ञात व्यक्तीने पाठविले असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली आहे.यासंदर्भात विक्रम राठोड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या धमकीच्या पत्रामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. आमदार संग्राम जगताप हे अहमदनगरचे विद्यमान आमदार आहेत. राज्यात जरी महाविकास आघाडी असली तरी नगरमध्ये या पॅटर्नला तडा गेलेला आहे. अहमदनगर शहरात गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेचा एकहाती बोलबाला पालिकेवर आणि विधानसभा क्षेत्रावर होता. याचे मुख्य कारण म्हणजे दिवंगत अनिल भैय्या राठोड यांचं कट्टर नेतृत्वहिंदुत्ववादी विचारांना सोबत घेणारा नेता म्हणजे अनिल भैय्या असं समीकरण नगर शहरात असल्याने सलग पाच विधानसभा निवडणुकीमध्ये राठोड यांचा शहरावर बोलबाला राहिला.
कोरोनाच्या महामारीत राठोड यांचे निधन झाले. त्यानंतर सर्व सूत्र शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी हातात घेतली. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आघाडीवर राहून प्रचार करत होते. विक्रम राठोड हे सध्या पक्षवाढीचं काम जोरदार करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here