हिवाळी अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे, प्रश्न मांडणार - आ. संग्राम जगताप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

हिवाळी अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे, प्रश्न मांडणार - आ. संग्राम जगताप.

 हिवाळी अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे, प्रश्न मांडणार - आ. संग्राम जगताप.

शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपाला आ. संग्राम जगताप यांचा पाठिंबा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यातील अकृषी विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या सातवा वेतन आयोगाची 58 महिन्याची थकबाकी अदा करावी, अकृषी विद्यापीठातील पदांना सातवा वेतन आयोग लागू करावा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दहा-वीस व तीस वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचार्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द झालेला शासन निर्णय पुनर्जीवित करण्यात यावा, तसेच सुधारित संरचना लागू करण्यात यावी, पाच दिवसाचा आठवडा पदोन्नतीतील कर्मचार्यांचे आरक्षण, कॅशलेस मेडिकल सुविधा, कर्मचार्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षणाची सवलत, अनुकंपा भरतीचे नियम शिथिल करावे अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने 18 डिसेंबर पासून बेमुदत संप सुरु आहे.
या आंदोलनास आमदार संग्राम जगताप यांनी पाठिंबा देऊन सदर प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिले. शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार जगताप यांना देण्यात आले.महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार कर्मचारी यांच्या प्रलंबीत मागण्या सोडविण्याची शासनाकडे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रह करून सदर प्रश्न लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले. यावेळी शहरातील महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचार्यांनी कामबंद ठेऊन न्यू आर्टस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment