26 ते 30 जानेवारी लोकशाही उत्सव होणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 24, 2021

26 ते 30 जानेवारी लोकशाही उत्सव होणार

 26 ते 30 जानेवारी लोकशाही उत्सव होणार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्येमध्ये प्रजासत्ताक दिनापासून ते हुतात्मादिनापर्यंत समविचारी संस्था संघटनांच्या वतीने लोकशाही उत्सव होणार आहे व त्यासाठी डॉ प्रशांत शिंदे अध्यक्ष, आर्कि अर्षद शेख सचिव, तर अशोक सब्बन खजिनदारपदी या तिघांनी निवड करण्यात आल्याची माहिती निमंत्रक डॉ प्रा. महेबूब सय्यद व विठ्ठल बुलबुले यांनी दिली.
दि 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताकदिन ते दि. 30 जानेवारी हुतात्मादिन असे 5 दिवस लोकशाहीच्या बळकटीसाठी, लोकशाहीचे विचार आचाराचे मनामनात रुजवात व्हावी म्हणून विविध उपक्रम होणार आहेत ज्यात मान्यवर विचारवंतांचे व्याख्याने, परिसंवाद, चित्रपट, लघुपटावर चर्चासत्र,  विविध प्रदर्शनी, विविध स्पर्धा, पथनाट्य, समूहागीत, समूहनृत्य हास्य कविसंमेलन, आदी भरगच्च कार्यक्रम होणार असल्याचे अध्यक्ष डॉ प्रशांत शिंदे यांनी सांगितले.बैठकीच्या सुरुवातीला आर्कि. अर्षद शेख यांनी लोकशाही उत्सवाची भूमिकाची मांडणी व प्रास्ताविक केले.तर पुण्यातील लोकशाही उत्सव समितीच्या सीमाताई चव्हाण यांनी 19 वर्षांपूर्वी हा उत्सव सुरू करण्यात आला आणि त्यातील विविधांगी उपक्रमांची माहिती, येणार्‍या अडचणी,झालेले होत असलेले कार्यक्रम त्याची वैशिष्ठे व लोकशाही उत्सवाची आजच्या काळाची गरज याची मांडणी केली. या बैठकीत  रावसाहेब पटवर्धन समितीचे अड् रवींद्र शितोळे, राष्ट्र सेवादलाचे शिवाजी नाईकवाडी, भ्रष्ट्राचार विरोधी जनांदोलनाचे कैलास पठारे,  सुधीर लंके, डॉ बाळासाहेब पवार, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे फिरोज शेख, सौ सोनाली प्रशांत शिंदे, सौ सुरेख विद्ये,आदी मान्यवरांनी उत्सव अधिक दिशादर्शक पारदर्शक, लोकसहभाग वाढेल असे उपक्रमंबाबत सूचना केल्या व जबाबदारी स्वीकारली. आर्कि. अर्षद शेख यांनी शहरातील व आसपासच्या ग्रामीण भागातील संस्था संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले तर अशोक सब्बन यांनी सांगितले की ही समिती अस्थायी असून लवकरच व्यापक समिती करून लोकशाही उत्सव मोठ्या प्रमाणावर केल्या जाईल. या बैठकीचे संपूर्ण सूत्रसंचालन डॉ प्रा. महेबूब सय्यद यांनी केले. शेवटी आभार सौ सोनाली शिंदे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here