प्रमुख रस्त्यांवर अनधिकृत पत्र्याचे शेड, गाळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 20, 2021

प्रमुख रस्त्यांवर अनधिकृत पत्र्याचे शेड, गाळे

 वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा. प्रमुख रस्त्यांवर अनधिकृत पत्र्याचे शेड, गाळे

मनपाचा महसूल बुडतोय; कारवाई करा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एमआयडीसी पासून ते केडगाव, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, तपोवन रोड, सह प्रमुख रस्त्यांच्या कडेला मनपाचा महसूल बुडवून पत्र्याचे शेड टाकून भाड्याने देण्याचा नवीन फंडा सध्या नगर शहरात सुरू झाला आहे. कोणत्याही प्रकारची हमी न घेता व इन्स्टंट व्यापारी होण्याच्या उद्देशाने हे व्यापारी या अनाधिकृत गाळ्यांमध्ये व्यवसाय करीत आहेत. पत्र्याच्या शेड व गाळे यांना ना पार्किंग साठी ना मार्जिन जागा सोडण्यात आली. शिवाय पत्राच्या गाळ्यातील जागाही मर्यादित असल्याने अनेकांचा माल रस्त्यावर आलाय. त्यातून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.काही ठिकाणी महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता पक्के बांधकाम केले आहे. अनधिकृत पत्र्याचे शेड आणि गाळेधारकांवर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यावेळी मनपा आयुक्तांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
शहराच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला खाजगी मालमत्ता धारकांच्या जागेत एमआयडीसी पासून केडगाव पर्यंत तसेच उपनगरात गुलमोहोर रोड, पाईपलाईन रोड, तपोवन रोड आणि इतर भागात मनपाच्या आरक्षित आणि न्यायप्रविष्ट असणार्‍या जागांवरती मोक्याच्या ठिकाणी अहमदनगर मनपाचा महसूल बुडवित अहमदनगर मनपाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता नियमांचे उल्लंघन करीत अनाधिकृत पणे पत्र्याचे शेड टाकून त्यात पत्र्याचे प्रत्येकी सात ते दहा गाळे काढून ते भाडोत्री देऊन अवैधरित्या कमाई करत आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ, गुलमोहर रोड, एकविरा चौक, पाईपलाईन रोड, तपोवन रोड, एमआयडीसी, तसेच केडगाव मध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनधिकृत पत्र्याचे गाळे काढले आहेत या अनधिकृत गाळ्यांना अभय कोणाचे? महानगरपालिका अतिक्रमण विभाग फक्त नोटिसा बजावून पेपरबाजी करून दिवाळी नंतर टपरी मार्केटवर हातोडा अश्या अशायची बातमी प्रसिद्ध होऊन देखील आज पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाल्याची दिसून येत नाही. सदर पेपरबाजी ही सर्वसामान्य नगरकरांची दिशाभूल आहे की वास्तव आहे याबाबत नगरकर संभ्रमात आहे. कारवाई करण्याचा देखावा करीत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. अतिक्रमण विभाग अधिकारी यांना या अनधिकृत गाळेधारकांकडून चांगलीच मलाई मिळते असे वाटायला लागले आहे. संबंधित सर्व अधिकारी यांची प्रशासकीय स्तरावर आणि मालमत्तेची सखोल चौकशी करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी अहमदनगर च्या वतीने अहमदनगर औरंगाबाद रोड महानगरपालिका समोर रास्ता रोको करून पालिकेच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येईल.अशी मागणीही यावेळी करण्यात येत आहे.
जेणेकरून अहमदनगर शहरातील प्रामाणिक छोटे मोठे व्यावसायिक हे महानगरपालिका चे सर्व कर नियमाने भरत आहेत. तसेच इतर कर,आयकर,विक्रीकर, वस्तू सेवा कर यांसारखे सर्व कर नियमित आणि प्रामाणिकपणे भरत आहेत. अशा छोट्या मोठया प्रामाणिक व्यावसायिक व्यापार्‍यांवर अन्याय होणार नाही, याची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा.या अनुषंगाने देखील शहरातील सर्व छोट्या मोठया प्रामाणिक व्यावसायिक व्यापार्‍यांना वंचित बहुजन आघाडी ने पुकारलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडी ने केले आहे.
यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे ,जिल्हा संघटक फिरोज पठाण ,जीवन पारधे,संजय जगताप,सचिन पाटील,प्रवीण ओरे,विशाल साबळे,भाऊ साळवे,अमर निरभणे, विद्याताई जाधव, बेबी राम निरभवणे, श्रुती सरोदे, धनश्री शेंडगे, ज्योती घोडके, जयश्री काते, प्रमोद आढाव, आत्माराम डागवाले, नयन अल्लाट, मुमताज शेख, रेश्मा शेख, सायली चांदेकर स्वप्निलानी चांदेकर,आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment