मोकाटे प्रकरणाचे कर्डिलेच मास्टरमाईंड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 20, 2021

मोकाटे प्रकरणाचे कर्डिलेच मास्टरमाईंड.

 मोकाटे प्रकरणाचे कर्डिलेच मास्टरमाईंड.

आघाडीच्या नेत्यांचा पत्रकार परिषदेत आरोप.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यात सुसंस्कृत आणि विकासाचे राजकारण केले जात होते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून नगरच्या राजकारणाची प्रतिमा खालावली आहे. गोविंद मोकाटे आणि त्यांच्या परिवाराला जीवनातून, राजकारणातून उठविण्याचा प्रयत्न सध्या चालविला आहे. मोकाटे प्रकरणात कर्डिलेच मास्टरमाईंड आहेत असा आरोप नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.
गोविंद मोकाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी मोकाटे यांची जेऊर गटातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आरपीआयच्यावतीने जिल्हाप्रमुख गाडे यांच्या पुतळ्यास जोडे मोरो आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर नगर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके म्हणाले, माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांच्या काळात सुसंस्कृत आणि विकासाचे राजकारण व्हायचे, परंतु आता वैयक्तिक आणि दुसर्या आयुष्यातून उठविण्याचे राजकारण सुरु आहे. ते आता लोकप्रतिनिधी राहिले नसल्याने काहीच मुद्दा नसल्याने दुसर्याचे आयुष्य उद्वस्त करण्याचे काम विरोधक करत आहेत.
संदेश कार्ले म्हणाले, गोविंद मोकाटे यांची उमेदवारी जिल्हा प्रमुख प्रा. गाडे यांनी जेऊर गटातून जाहीर केली. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करायला लावले. मोकाटेंना राजकाणातून संपविण्यासाठी कोण षडयंत्र रचत आहे सर्वांना माहित आहे. गाडे सरांनी उमेदवार जाहीर केला तर तुम्हीही उमेदवार जाहीर करा. समोरा समोरा लढाई होवू द्या, संसार उद्वस्त करण्याचे काम करु नका. अन्यथा आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल असा इशारा दिला. बाळासाहेब हराळ म्हणाले, विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने प्रतिष्ठीतांना राजकारणातून संपविण्याठी षडयंत्र रचले जात आहे. आम्ही मंजूर केलेल्या विकास कामांचे उद्घाटन विरोधक करत आहेत. 25 वर्षात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगर तालुक्यासाठी काय केले हे त्यांनी जाहीर सांगावे. आम्ही आमच्या कामाचा हिशोब देतो भगत म्हणाले, नगर तालुका बाजार समितीमधील गैरव्यवहार झाकण्यासाठी, विषय दुसरीकडे वळविण्यासाठी षडयंत्र रचून मोकाटेंवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी शरद झोडगे, केशव बेरड, राजेंद्र भगत, बाबासाहेब गुंजाळ यांनीही विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, बाळासाहेब हराळ, उपसभापती डॉ. दिलीप पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, बाबासाहेब गुंजाळ, माजी सभापती रामदास भोर, रविंद्र भापकर, केशव बेरड, प्रकाश कुलट, प्रविण गोरे, संदीप गुंड, व्ही डी काळे, गुलाब शिंदे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment