महिलेच्या पर्स चोरी गुन्ह्यातील दोन आरोपी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 10, 2021

महिलेच्या पर्स चोरी गुन्ह्यातील दोन आरोपी गजाआड.

 महिलेच्या पर्स चोरी गुन्ह्यातील दोन आरोपी गजाआड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 7 डिसेंबरला सावेडीतील गुलमोहर रोड वरील स्वीट होम दुकानच्या मागील महिलेच्या सायकलवरील पर्स बळजबरीने ओढून पळविणार्‍या गणेश देविदास नल्ला वय 23 रा.श्रमिक नगर, शैलेश काटक वय 20 रा.जिमखाना ग्राऊंड या दोघांना अटक केली असून गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून मुद्देमालात रोख1400 रुपये, चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी, आणि एकूण 18 रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पो नि ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पो नि समाधान सोळंके करत आहेत.
सावेडीत गुलमोहर रोडवरील स्वीट होम दुकाना मागील भागातून एका महिलेच्या सायकलला लावलेली पर्स बळजबरीने ओढून लुटली होती. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबात पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी ठाण्याच्या शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, धीरज खंडागळे, चेतन मोहिते यांनी दाखल गुन्हा भादवी कलम 392, 34 नुसार तपास करत गुन्ह्यातील संशयित हे नागपूर एमआयडीसी परिसरात जिमखाना ग्राऊंड इथे असल्याचे तपासात शोधले. यात गणेश देविदास नल्ला, शैलेश दत्तात्रय फाटक यांना विश्वासात घेत माहिती विचारली असता त्यांच्या कडे असलेली आनंदऋषी  हॉस्पिटल येथून चोरलेली मोपेड ऍक्टिवा चोरल्याचे तसेच स्वीट होम मागे महिलेच्या सायकलवरील पर्स बळजबरीने चोरल्याची कबुली दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here