अर्बन बँकेवरील निर्बंध हटण्यासाठी रिझर्व बँक व केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे प्रयत्न करू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

अर्बन बँकेवरील निर्बंध हटण्यासाठी रिझर्व बँक व केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे प्रयत्न करू.

 अर्बन बँकेवरील निर्बंध हटण्यासाठी रिझर्व बँक व केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे प्रयत्न करू.

अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचे आश्वासन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर अर्बन बँकेच्या व्यवहारावर रिझर्व बँकेने निर्बंध आणल्यावर बँकेच्या संचालक मंडळाने निर्बंध उठण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आज सकाळी बँकेचे संचालक व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या नेतृत्वाखाली सत्तधारी गटाचे नेते सुवेंद्र गांधी यांनी नवी दिल्लीत केद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची भेट घेऊन अर्बन बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधांची माहिती देवून हे अन्यायकारक निर्बंध त्वरित शिथिल करावेत व अर्बन बँकेचे सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत करावेत अशी विनंती करून निवेदन दिले. यावेळी संचालक राहुल जामगावकर व अ‍ॅड.राहुल जामदार उपस्थित होते.
यावेळी मंत्री डॉ.भागवत कराड यांनी शिष्ठ मंडळास आश्वासन देत, अर्बन बँकेवरील निर्बंध हटण्यासाठी रिझर्व बँक व अर्थ मंत्रींकडे पाठपुरावा करून सर्व प्रकारचे सहकार्य करू असे सांगितले.

No comments:

Post a Comment