पालकमंत्री हसन मुश्रीफांचे जिल्हा प्रशासनाला आदेश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, December 18, 2021

पालकमंत्री हसन मुश्रीफांचे जिल्हा प्रशासनाला आदेश.

 पालकमंत्री हसन मुश्रीफांचे जिल्हा प्रशासनाला आदेश.

उद्यापासून लस न घेणार्‍यांना पेट्रोल पंप व रेशन दुकानावर प्रतिबंध!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना लसीचा एकही डोस न घेणार्‍या नागरिकांना आता पेट्रोल, रेशन तसेच इतर सुविधांपासून मुकावे लागणार आहे त्यामुळे आता पेट्रोल पंपावर गेल्यावर अथवा रेशन दुकानात गेल्यावर अथवा प्रशासनाच्या काही सेवांचा लाभ नागरिक घेत असतील तर त्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकार्‍यांना तशा सूचना दिल्या आहेत. नगर जिल्ह्यात उद्यापासून या कारवाईला सुरूवात होणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात जवळपास नऊ लाख नागरिकांनी कोरोनाचे एकही डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री हसनमुश्रीफ यांनी दिली आहे.तर पाच लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक डोस घेत नासल्याने आता प्रशासनाने कठोर पाऊल उचलणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here