हजारो कोटींचे घोटाळे का झाले? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 18, 2021

हजारो कोटींचे घोटाळे का झाले?

 हजारो कोटींचे घोटाळे का झाले?

पूर्वी प्रत्येक जिल्ह्यात बँकेचे जाळं! कुठे गेल्या या बँका?
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची जोरदार टोलेबाजी.

प्रवरा येथील कार्यक्रमात गृहमंत्रीअमित शहा यांच्या हस्ते हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या आणि बीज बँकेच्या राहीबाई पोपरे यांचा गौरव करण्यात आला. राहीबाई यांचा पैठणी, सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी राहीबाई आणि पोपटरावांची अमित शहा यांना ओळख करून दिली. दरम्यान, यावेळी रमेश धोंगडे यांचा साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांचा अमित शहा यांनी एक लाखाचा चेक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पूर्वी जिल्हा बँकांचं जाळं होतं. आज काय झालं? कुठे गेल्या या बँका ? घोटाळे का झाले? स्थिती काय आहे. केवळ तीनच उरल्या आहे. हजारो कोटीचे घोटाळे कसे झाले. हे काय रिझर्व्ह बँकेने केले का  नाही? नाही.. रिझर्व्ह बँकेने केले नाही. मी राजकीय भाष्य करायला आलो नाही. पण सहकारीता आंदोलनातील कार्यकर्त्यांना जरूर सांगेल सरकार तुमच्या सोबत आहे. मोदी तुमच्यासोबत आहे. सहकारीता आंदोलनावर अन्याय होणार नाही. पारदर्शकता आणली पाहिजे. व्यावसायिकता आणली पाहिजे. मुलांना सहकारीतेचा मंत्र शिकवून त्यांना या आंदोलनात सहभागी करयाला पाहिजे. नव्या नेतृत्वाकडे त्याची धुरा दिली तर पुढील 50 वर्ष ही चळवळ टिकून राहील. असं मत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त करत सहकार चळवळीचं महत्व व्यक्त केलं.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत बोलताना अमित शहा यांनी सहकार चळवळ मागे का पडली, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले, याविषयी जोरदार फटकेबाजी केली.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले, ‘ सहकार चळवळ मागे का पडली याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. सहकाराकरिता काहीही मदत लागली तरी नरेंद्र मोदी सरकार 24 तास तुमच्या मदतीसाठी तयार आहे, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं.
राज्यातले अनेक नेते केंद्रात गेले. ते सहकाराबद्दल बोलले. मात्र, त्यांनी काहीच काम केले नाही, भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरसंधान साधलेत्यांच्या बोलण्याचा रोख कोणावर आहे, हे मंचावरील मान्यवरांनी ओळखून गालातल्या गालात किंचित स्मितहास्य केले. विखे-पाटील प्रवरा येथे बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात बैलगाडी आणि नांगर यांची प्रतिकृती देत अमित शहा यांचा सन्मान करण्यात आला. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुरुवातीला उपस्थितांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, सहकाराच्या पंढरीत आज सोन्याचा दिवस आहे. या सहकार पंढरीत अमित शहा यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. कोविडनंतर पहिल्यांदाच एवढी मोठी सभा होत आहे. आपण सहकार मंत्री झालात आणि सहकार चळवळीला ताकद मिळाली, अशा शब्दांत त्यांनी यावेळी शहा यांचे कौतुक केले. देशासमोर प्रवरा कारखाना हे मॉडेल असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
विखे-पाटील पुढे म्हणाले की, मधल्या काळात सहकार सहकार चळवळीची पीछेहाट झाली आहे. मात्र, आता आपण सहकार मंत्री झाल्याने नवी संजीवनी मिळेल, असा आशावाद त्यांनी अमित शहा यांच्याकडे पाहून व्यक्त केला. राज्यातील सहकारी कारखानदारीचे खासगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेकांनी खासगी कारखाने काढले आणि सहकाराला दोष दिला, असे म्हणत त्यांनी नाव न घेता टोलेबाजी केली. राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, खरे तर राज्यातल्या सहकार चळवळीला आधार देण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला जीवदान दिले आहे. राज्यातले अनेक नेते केंद्रात केले. ते फक्त सहकारावर भरभरून बोलले. मात्र, त्यांनी सहकाराबद्दल काहीही केले नाही, अशी टीका त्यांनी कोणाचेही नाव न घेता केली. मात्र, त्यांच्या बोलण्याचा रोख कोणावर आहे, हे मंचावरील मान्यवरांनी ओळखून गालातल्या गालात किंचित स्मितहास्य केले.
केंद्रीय सहकारी मंत्री यांनी प्रवरानगर येथील भूमीचे वर्णन करताना , ही भूमी सहकारीता क्षेत्रात काशी एवढीच पवित्र आहे, असे म्हटले. ते म्हणाले, ‘ त्याकाळात बाळासाहेब विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांनी सहकाराची चळवळ रोवली. सहकार क्षेत्रात काम करणार्‍यांनी या भूमीत येऊन नतमस्तक व्हायला हवं. गुजरातमध्येही सहकार चळवळ सुरू झाली. अमूल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अमूलचा टर्न ओव्हर 50 हजार कोटींचा आहे. महाराष्ट्रात पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्यात चळवळ उभी केली. मोदींनी सहकारीतासाठी सहकार मंत्रालय तयार केलं. 75 वर्ष कुणालाही असं मंत्रालय करावं असं वाटलं नाही. सहकारीता आजही प्रासंगिक आहे. सबका साथ आणि सबका विकासचा मंत्र केवळ सहकारीतेतूनच होऊ शकतो हे माहीत आहे म्हणूनच मोदींनी हे मंत्रालय तयार केलं, असंही अमित शहा म्हणाले.

No comments:

Post a Comment