प्रदीप परदेशी संधीचे ते सोनं करतील- अ‍ॅड. आगरकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

प्रदीप परदेशी संधीचे ते सोनं करतील- अ‍ॅड. आगरकर

 प्रदीप परदेशी संधीचे ते सोनं करतील- अ‍ॅड. आगरकर

नूतन नगरसेवक प्रदीप परदेशी यांचा श्री विशाल गणेश देवस्थानच्यावतीने सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरसेवक हे पद नागरिकांचे सेवा करण्याचे साधन आहे, नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच आपल्या भागाचा आणि नगरचा विकास करण्याचे काम नगरसेवकांनी करणे आवश्यक आहे. भैय्या परदेशी सामाजिक, धार्मिक कार्यात सक्रिय राहून अनेक उपक्रम राबवित असतात, त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना नागरिकांनी मताच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. त्यांची ही सेवा आणखी विस्तृत करण्याची संधी दिली आहे, या संधीचे ते सोनं करतील, असा विश्वास श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी व्यक्त केला.
भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रदीप परदेशी यांचा शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त गजानन ससाणे, प्रताप परदेशी, मयुर बोचूघोळ, रणजित परदेशी, संदिप गोंधळे, स्वप्नील लाहोर, बंट्टी परदेशी आदि उपस्थित होते. सत्कारास उत्तर देतांना प्रदीप परदेशी म्हणाले, सामाजिक, धार्मिक कार्य करत असतांना अनेक मित्र परिवाराचा आपणास मोठे सहकार्य लाभत असते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने आज नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी प्रभागातील नागरिकांनी दिली आहे. श्री विशाल गणेशाच्या आशिर्वादाने मनपाच्या माध्यमातून नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सांगितले. याप्रसंगी अशोकराव कानडे यांनी प्रास्तविक केले तर गजानन ससाणे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment