ऑक्सीजन बेड्सची संख्या वाढविण्याबरोबरच जीनोम सीक्वेसिंग लॅब उभारण्यासाठी शिर्डी संस्थानने प्रयत्न करावेत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

ऑक्सीजन बेड्सची संख्या वाढविण्याबरोबरच जीनोम सीक्वेसिंग लॅब उभारण्यासाठी शिर्डी संस्थानने प्रयत्न करावेत

 ऑक्सीजन बेड्सची संख्या वाढविण्याबरोबरच जीनोम सीक्वेसिंग लॅब उभारण्यासाठी शिर्डी संस्थानने प्रयत्न करावेत

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सूचना

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
शिर्डी ः कोरानाच्या संभाव्य लाटेसाठी प्रशासनाने सज्ज राहिले पाहिजे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच ऑक्सीजन बेड्स ची संख्या वाढविली पाहिजे. तसेच शिर्डी संस्थानने जीनोम सीक्वेसिंग लॅब उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा सूचना नाशिक महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज येथे दिल्या.शिर्डी येथील श्री.साईबाबा संस्थानच्या सभागृहात बुधवार, 22 डिसेंबर 2021 रोजी नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संभाव्य लाटेसाठी आवश्यक असलेल्या तयारीच्या आढाव्याची बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री.गमे बोलत होते.यावेळी अहमदरनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफडे, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, साईबाबा रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक प्रितम वडगावे, वैद्यकीय अधीक्षिका डॉ.सुनिता कडू आदी उपस्थित होते.श्री.गमे यावेळी म्हणाले, कोरोनाच्या ओमीक्रान व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर संस्थानने व जिल्हा प्रशासनाने समन्वयाने कामकाज केले पाहिजे. संभाव्य लाटेसाठी सज्ज राहिले पाहिजे. यासाठी शिर्डी संस्थांनने ’जीनोम सीक्वेसिंग लॅब’ उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून याचा लाभ विविध आजारांवरील व्हेरियंट तात्काळ शोधण्यास मदत होईल. तसेच शिर्डी संस्थानने त्यांच्या रूग्णालयातील सध्याच्या ऑक्सीजन बेड्सच्या संख्येत 100 ने वाढ केली पाहिजे. यासाठी दानशूर संस्थांना मदतीचे आवाहन करावे.प्रत्येक दिवशी 5 हजार लोकांची आरटीपीसीआर टेस्ट करता येतील. असे नियोजन करण्यात यावे. लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन साठी प्लाँट कार्यान्वीत करण्यात यावा. वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय सामुग्री, ड्यूरा सिलेंडर आदी बाबींचे नियोजन करण्यात यावे. अशा सूचना ही यावेळी विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी दिल्या.शिर्डी संस्थानने सुरू कोरोना विषयक केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment