सराईत गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी कलमाअंतर्गत कारवाई करावी सय्यद कुटुंबाची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, December 23, 2021

सराईत गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी कलमाअंतर्गत कारवाई करावी सय्यद कुटुंबाची मागणी

 सराईत गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी कलमाअंतर्गत कारवाई करावी सय्यद कुटुंबाची मागणी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सराईत गुन्हेगारास अटक करुन योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कलमांतर्गत सुद्धा कारवाई करावी अशी मागणी आज अरबाज शकील सय्यद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर आरोपी साबीर अय्युब शेख,  फय्याज अख्तर शेख, अरबाज अरतर शेख यांना अटक करण्यात यावी मला व माझे कुटुंबीयांना त्याचेपासुन संरक्षण मिळावा आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा, असे त्यांनी म्हणले आहे.
कोतवाली पोलिस स्टेशन येथे मा.द.वि.चे कलम 326, 504, 506 सह 34 अन्वये गुन्हा रजि.नं. 702/2021 नुसार फुरखान शकिल शेख, साबीर अय्युव शेख, फय्याज अख्तर शेख व अरबाज अख्तर शेख यांचे विरुध्द त्यांनी केलेल्या मारहाणीनुसार दाखल केलेला आहे.
सदर गुन्हयामधे आरोपी  फुरखान शकिल शेख,  साबीर अय्युब शेख, फय्याज अख्तर शेख यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी आरोपी साबीर अय्युब शेख, फय्याज अख्तर शेख यांना  न्यायालयाने तपासी अधिकारी यांनी आरोपींचे गुन्हेगारी पार्श्वभुमी सादर केली नाही तसेच आरोपी यांचे विरुध्द कलम 307 ने होणारा गुन्हा असतांना केवळ कलम 326 नुसार गुन्हयाचे कागदपत्र सादर केले. तसेच मला तलवार, कोयता याने मारहाण केली माझा जबाब में न्यायालयासमोर सादर केला नाही, माझे मेडीकलचे पेपर्स देखील त्यांचे जामिन अर्जावेळी सादर केलेले नव्हते, तपासी अधिकारी यांचे चुकीमुळे मे. न्यायालयाने दोन व्यक्तींना त्याचे विरुध्द बरेच गुन्हे दाखल सादर न केल्यामुळे जामिन दिलेला आहे.
 सवर गुन्हयामधे आरोपी नामे अरबाज अख्तर शेख रा. मुकुंदनगर, अहमदनगर हा नजरेआड सतांना कारी यांनी त्यास जाणिवपूर्वक अटक केलेली नाही. त्याचे विरुध्द देखील गुन्हे असतांना त्यास तपसी अधिकारी यांनी समाजामधे वारण्यास मुभा दिलेली आहे. अशा गुन्हेगारास अटक करण्या ऐवजी त्याची पाठराखण केली जात आहे. हातमिळवणी केल्याने आरोपी हा नजरकैद असतांना सदर आरोपी हा हॉस्पिटल येथुन बाहेर गेलेला आहे. सदर आरोपी याने पोलिसांसोबत हातमिळवणी केल्याने खरी घटना व जखमांचे स्वरुप पाहता भा.द.वि.चे कलम 307 नुसार चा गुन्हा केलेला आहे असे असतांना सदर कलम लावण्यात आलेले नव्हते. यांनी पोलिस अधिक्षक, यांचेकडे पाठपुरावा केला असता त्यांचे आदेशानुसार भा.द.वि.चे कलम 307 हे वाढीव लावण्यात आलेले आहे. पोलिसांनी जाणुन बुजुन जखमीचा जबाब व तपासातील कागदपत्रे सादर मुळ मी यांनी कागदपत्रे, फोटो व जखमी सददाम याचे प्रमाणपत्र पोलिस अधिक्षक यांचे समोर सादर केल्यानंतर काल दि. 11/10/2021 रोजी सदर गुन्हयामधे वाढीव कलम 307 लावण्यात आलेला आहे. सदर अर्जदार हा सराईत गुन्हेगार असुन सदर अर्जदार याने विरुध्द कोतवाली पोलिस स्टेशन, नगर येथेच भा.द.वि.चे कलम 307 नुसार गुन्हा दाखल असुन इतर गुन्हे देखील दाखल आहेत. असे असतांना पोलिसांनी जाणीवपुर्वक सदर बाब जामिन अर्जाचे म्हणणे मधे नमुद केलेली नाही.
आम्ही गरीब कुटुंबातील असुन माझे वडील हे पान टपरी व्यवसायीक असुन माळीवाडा, अहमदनगर येथे राहतात. सदर घटनेवुन माझा भाऊ व मी बचावले आहेत. आरोपींनी संगनमत करून रागापोटी, व्देषापोटी जिवे मारण्याचा प्रयत्न करून मारहाण केलेली आहे.अर्जदार हे गुंड प्रवृत्तीचे असुन त्यांचेविरुध्द यापूर्वी देखील बरेच गुन्हे दाखल आहेत. मी गुन्हा दाखल केला अर्जदार यास अटक करण्यात आली याची माहीती मिळतान आरोपी याने माझेविरुध्द विरुध्द भा.द.वि.चे कलम 324 अन्वये गुन्हा दाखल केला. सदर आरोपी हे अत्यंत नंगड, आडदांग व गुड प्रवृत्तीचे असुन माझा भाऊ व माझे कुटुंबिय यांचे जिवीतास धोका आहे. इतर यांचे माझेवर व माझे भाऊ यांचेवर झालेल्या हल्यामुळे आमची स्थिती अत्यंत गंभीर आहे. गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे.जामिन मंजुर झाल्यास माझे व साक्षीदारांचे जिवीतास धोका आहे. याकारणाने सदर आरोपी यांना जामिन मंजुर केल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकतील, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करतील, योग्य तो तपास होवु शकणार नाही. सदर गुन्हयाचा तपास होणे गरजेचे असुन त्याकरीता सदर अर्जदार यांना कोठडीत ठेवण्याची नितांत गरज आहे. माझे व नातेवाईक यांचे गावामधे राहणे मुश्किल होईल. सदर आरोपी. साबीर अय्युब शेख, फय्याज अख्तर शेख, अरबाज अरतर शेख यांना अटक करण्यात यावी मला व माझे कुटुंबीयांना त्याचेपासुन संरक्षण मिळावा आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here