आ. नीलेश लंके यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित होणार ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 19, 2021

आ. नीलेश लंके यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित होणार !

 आ. नीलेश लंके यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित होणार !

मराठी व हिंदी भाषेत होणार चित्रीकरण

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः लोकवर्गणी करून तब्बल 60 हजारांच्या मताधिक्क्याने विधानसभेत पोहचलेल्या आमदार नीलेश लंके यांच्या जिवनावर आता चित्रपट प्रदर्शीत होणार आहे. चित्रपट निर्मात्याने आ. लंके यांच्या जिवनावर 900 पानांची स्टोरी तयार केली असून आ. लंके यांचा इयत्ता पाचवीपासून शरद पवार आरोग्य मंदीरापर्यंतचा प्रवास या चित्रपटामध्ये चित्रीत करण्यात येणार आहे.
येत्या 24 ऑक्टोबर रोजी पिंपळनेर येथे या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. आ. नी
लेश लंके, त्यांच्या पत्नी जि. प. सदस्या राणी लंके यांच्या उपस्थितीत या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. आ. लंके यांची भुमिका साकार करण्यासाठी आ. लंके यांच्या चेहयाशी साधर्म्य असलेल्या अभिनेत्याचाही शोध घेण्यात आला आहे. मराठी व हिंदी भाषांमध्ये हा चित्रपट चित्रित करण्यात असुन एकाच वेळी 1 हजार चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित करण्याची योजना आहे.

विधानसभा निवडणूकीत ऐतिहासिक विजय संपादन केल्यापासून आ. नीलेश लंके यांचे नाव राज्यभर चर्चेत आहे. विधानसभेचे तत्कालीन उपसभापती विजय औटी यांचा धक्कादायक पराभव करून आ. लंके हे जायंट किलर ठरले. राज्यात सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतही आ. लंके यांचे नाव चर्चेत होते. पुढे विधिमंडळात सरकारच्या जादुई आकडयाची उद्घोषणा करण्याची संधीही योगागोगाने नीलेश लंके यांना मिळाली.
पहिली लाट ओसरल्यानंतर दुसर्‍या लाटेमध्ये प्रशासनापुढे मोठे संकट उभे होते. रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असताना आ. लंके यांनी जिल्हयातील पहिले कोव्हीड सेंटर शरद पवार यांच्याच नावाने भाळवणी येथे सुरू केले. लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या या सेंटरसाठी देशविदेशातून देणग्या देण्यात आल्या. स्वतः आ. लंके हे रुग्णांमध्ये वास्तव्य करून त्यांना आधार देण्याचे काम करीत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची चर्चा अधिकच होऊ लागली. राज्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या  सेंटरला भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली. आ. लंके यांच्या कामाचे कौतुक केले. समाजासाठी सर्वस्व झोकून दिलेल्या आ. लंके यांच्या जिवनावर आता चित्रपट प्रदर्शीत होणार असून त्याविषयी सर्वत्र कुतूहल आहे.

No comments:

Post a Comment