करोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा- राम शिंदे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 10, 2021

करोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा- राम शिंदे.

 करोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा- राम शिंदे.

आजोबांच्या शब्दाला आ.रोहित पवारांकडून कवडी किंमत,


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
जामखेड ः मी मंजूर केलेली जामखेड ची नळ पाणीपुरवठा योजना जाणीव पूर्वक दोन वर्षे प्रलंबित ठेवून जनतेला स्वच्छ पाण्या पासून वंचित ठेवले केवळ स्वतःला श्रेय घेण्यासाठी तसेच आम्ही मंजूर केलेल्या कामांचे भुमिपूजन करून आ रोहित पवार हे दिंडोरा पिटवुन स्वतच आपल्या स्वागताचे फलक लावून प्रसिद्धी मिळवत आहेत. जामखेडची नळ पाणीपुरवठा योजना तत्कालीन सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मी मंजूर करून आणली. परंतु आ रोहित पवार यांनी आपल्याला श्रेय घेण्यासाठी ही योजना दोन वर्षे प्रलंबित ठेवून दोन दिवसापूर्वी ही योजना मंजूर करून मी आणली असे फलक आ रोहित पवार यांनी स्वत लावून प्रसिद्धी मिळवली आहे. फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी फेसबुक व्हॉटसअप सोशल मीडिया माध्यमातून खोटे बोलत आहे. खर्डा किल्ल्यासाठी आम्ही चार कोटी निधी मंजूर करून किल्लाचे काम केले,  भगवा झेंडा हे हिंदुत्वाचे प्रतीक आहे. आम्ही कधीच झेंडा मिरवत फिरलो नाही. कर्जत येथील गोदड महारांच्या पालखी समोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश पायदळी तुडवत,आजोबांच्या शब्दाची कवडी किंमत करणार्‍या नातू आ रोहित पवार विरोधात करोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा. अशी मागणी माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
याप्रसंगी शिंदे पुढे म्हणाले की, दोन वर्षापासून निवडणूक झाल्यानंतर आ. रोहित पवार पक्षातील लोकांना किंमत देत नाही. उलट आमच्या पक्षातील पदाधिकारी यांना अडचणीत आणुन उद्योग धंद्यावर बोट ठेवून अडचणी निर्माण करत जबरदस्तीने प्रवेश करून घेत आहेत. हे सरकार तालीबानी आह.े हे सरकार शेवटची घटका मोजत आहे. ओबीसींना 50 टक्के आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणूका होणार नाहीत.
पञकार परिषदेत भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले जिल्हा सरचिटणीस मनेश मासाळ जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात माजी सभापती भगवान मुरुमकर पंचायत समितीचे उपसभापती रवी सुरवसे डॉ ज्ञानेश्वर झेंडे बिभीषण धनवडे सोमनाथ राळेभात अमित चिंतामणी पांडुरंग उबाळे सलिम बागवान अभिजीत राळेभात प्रविण सानप प्रविण चोरडीया सरपंच बापुराव ढवळे केशव वनवे अनिल शेळके यासह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment