महापारेषणचा टॉवर अंगावर कोसळला; तरुणाचा मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 10, 2021

महापारेषणचा टॉवर अंगावर कोसळला; तरुणाचा मृत्यू.

 महापारेषणचा टॉवर अंगावर कोसळला; तरुणाचा मृत्यू.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
जामखेड ः गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी जामखेड तालुक्यातील चुंबळी गावात धक्कादायक घटना घडली आहे महापारेषणचा पोल अंगावर पडल्याने आनंद प्रभाकर हुलगुंडे वय 25 वर्ष या युवकाचा जागीच मृत्यू झाला यामुळे चुंबळी परिसरावर शोककळा पसरली आहे. आनंद याचे गेल्याच वर्षी लग्न झाले होते त्याच्या मागे आई वडील, पत्नी व एक भाऊ व बहिण असा परिवार आहे. घरातील कर्ता युवक गेल्याने हुलगुंडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जामखेड नगरपरिषद हद्दीतील चुंबळी येथील शिवारातून जाणारी महापारेषणची टॉवर लाईन आहे. आष्टी 132 केव्ही ते खर्डा 132 केव्ही जोडणारी लाईन आनंद हुलगुंडे यांच्या शेतातून जाते पण महापारेषणने हुलगुंडे यांना ठरल्याप्रमाणे कराराप्रमाणे पैसे दिले नाहीत असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे आमच्या शेतात तो टॉवर नको असे हुलगुंडे म्हणत होता. रात्रीच्या वेळी दोन ते अडीच च्या आसपास टॉवर मधील काही पोल हुलगुंडे यांच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत मृतदेह टॉवर मध्ये गुंतलेला होता पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. महापारेषणचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दुपारी दोन वाजता पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
आष्टी 132 केव्ह ते खर्डा 132 केव्ही यांना जोडणारी महापारेषणची टॉवर लाईन चुंबळी येथून जाते प्रभाकर हुलगुंडे यांना पिकाचे नुकसान म्हणून टॉवर बद्दल तीन लाख सहा हजार रुपये चेकने दिले आहेत. आमचे कामही पुर्ण झालेले आहे. पण रात्रीच्या वेळी आनंद हुलगुंडे यांनी टॉवरचे  सपोर्ट कापले त्यामुळे टॉवर एका बाजूला कलला व तो हुलगुंडे यांच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला अशी माहिती महापारेषणचे एक्सक्युटीव्ह इंजिनिअर संतोष चव्हाण यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment