गणेश मंडळांनी गणेशाचे मुखदर्शन ऑनलाइन उपलब्ध करून द्यावे- अप्पर पोलीस अधीक्षक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 10, 2021

गणेश मंडळांनी गणेशाचे मुखदर्शन ऑनलाइन उपलब्ध करून द्यावे- अप्पर पोलीस अधीक्षक.

 गणेश मंडळांनी गणेशाचे मुखदर्शन ऑनलाइन  उपलब्ध करून द्यावे- अप्पर पोलीस अधीक्षक.

गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शासनाने गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध केलेला असून दर्शन केवळ ऑनलाइन अथवा इलेक्ट्रिक माध्यमांद्वारे करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळांनी आपापल्या गणेश मूर्तीचे दर्शन ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.
02 अप्पर पोलीस अधीक्षक, 09 पोलीस उपअधीक्षक, 32 पोलीस निरीक्षक, 102 सपोनि, 2250 पोलीस अमलदार, 03 आरसीपी प्लाटून, 01 कंपनी एस आर पी एफ, 1000 होमगार्ड असा बंदोबस्त गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासनाने लावला आहे. अहमदनगर जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये व भाविकांनी गर्दी टाळावी सार्वजनिक अथवा खासगी गणेश मंडळांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढू नये.
अहमदनगर पोलीस दलातर्फे सर्व सार्वजनिक गणेश मंडळ व भाविकांनी कोविड-19 अनुषंगाने शासनाने दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून गणेशोत्सव शांततेच्या मार्गाने साजरा करून पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here