व्यसनमुक्तीच्या आरतीद्वारे श्री गणेशाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स व सहकारी मंडळांचे साकडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 14, 2021

व्यसनमुक्तीच्या आरतीद्वारे श्री गणेशाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स व सहकारी मंडळांचे साकडे

 व्यसनमुक्तीच्या आरतीद्वारे श्री गणेशाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स व सहकारी मंडळांचे साकडे

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स आयोजित व्यसनमुक्त भारत अभियान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः
भारतीय संस्कृतीत सणांना मोठे स्थान आहे. प्रत्येक सण चांगल्याचा वाईट प्रवृत्तीवर विजय अश्या आशयाचे असतात, त्याचा आनंद साजरा करणे म्हणजेच उत्सव परंतु उत्सवावर आज व्यसनांची छाया दिवसेंदिवस गडद होतांना दिसत आहे. चांगल्याचा वाईटवर विजय असा संदेश देणार्‍या उत्सवामध्ये जर व्यसनासारखे वाईट विघातक कृतीला, वृत्तीला किंवा वस्तूला जर प्रोत्साहन दिले जात असेल तर अश्या उत्सवाला, उत्सव म्हणता येईल का ? तर नक्कीच नाही यास्तव नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स आणि आयुषमान प्रतिष्ठाण मुंबई यांनी येत्या गणेश उत्सवात  व्यसन घालावा - उत्सव वाचवा  ही मोहीम राबविण्याचे ठरविले आहे.
गणेशोत्सव मंडळाने व्यसनी पदार्थ किंवा व्यसनी पदार्थांच्या नावाशी मिळत्या जुळत्या पदार्थांची जाहिरात स्वीकारू नये असे नम्र आवाहन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, आयुषमान प्रतिष्ठाण मुंबई यांच्या वतीने करण्यात येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव याकाळात व्यसनांच्या विरोधात प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच समाजात व्यसनांना प्रतिष्ठा मिळू नये याकरिता प्रचार पत्रके वाटप, गीत, पथनाट्याच्या माध्यमातून स्वयंसेवकांसमवेत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये व्यसनांच्या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.
सदर अभियान महाराष्ट्र राज्यात संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून श्री गणेशाला महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त करण्यासाठी साकडे घालण्यात येणार व्यसनांना समाजात प्रतिष्ठा मिळू नये तसेच व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांना आवाहन करण्यात येणार असल्याचे यावेळी राजीव निवतकर जिल्हाधिकारी मुंबई, समाधान इंगळे सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग मुंबई विभाग, प्रसाद खैरनार सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग मुंबई उपनगर, वर्षा विद्या विलास सरचिटणीस नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, अमोल मेडामे चिटणीस नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे ड.डॉ विक्रांत वाघचौरे संस्थापक अध्यक्ष, यांनी सांगितले.
यावेळी बसवराज शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष, भरत चवरे राष्ट्रीय उपाध्यक्ष, गणेश वाघचौरे राष्ट्रीय महासचिव, अशोक लांडगे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी व मुंबई शहर संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, विवेक साळवी महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी, केतन पाटील प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मुंबई लीगल एड सेलचे अभय सोडये उपस्थित होते.

No comments:

Post a Comment