रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने व राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मोफत दहा हजार सिरींज इन्जेक्शनचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, September 14, 2021

रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने व राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मोफत दहा हजार सिरींज इन्जेक्शनचे वाटप

 रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने व राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मोफत दहा हजार सिरींज इन्जेक्शनचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः  कोरोना महामारी मध्ये होत आसलेल्या सिरींज इन्जेक्शन चा तुटवडा लक्षात घेऊन येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त जामखेड ग्रामीण रुग्णालयास मोफत दहा हजार सिरींज इन्जेक्शन वाटप करण्यात आले.
या वेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर (आबा) राळेभात, सभापती राजश्री ताई मोरे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, प्रभारी तहसीलदार मनोज भोसेकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाघ, तालुका अरोगय अधिकारी सुनील बोराडे, नगरसेवक अमित जाधव, डिगंबर चव्हाण, अशोक धेंडे, राजेंद्र गोरे, उमर कुरेशी, वसीमभाई शेख, मोहन पवार, अमोल गिरमे, हरिभाऊ आजबे, प्रशांत राळेभात सह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना काळात रुग्णांची संख्या वाढत गेल्याने मोठ्या प्रमाणात सिरींज चा तुटवडा निर्माण झाला आहे. या अनुषंगाने रुग्णांना पुरेशा प्रमाणात सिरींज उपलब्ध व्हावी यासाठी जामखेड येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जामखेड ग्रामीण रुग्णालय येथे मोफत दहा हजार सिरींज वाटप करण्यात आले. तसेच आनखी सिरींज इन्जेक्शन लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोफत देण्यात येतील अशी माहिती प्रा मधुकर राळेभात यांनी कार्यक्रमा दरम्यान दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here