समाजाभिमुख काम करताना तात्यांचे जनतेसाठी मोठे योगदान ः सभापती दाते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 14, 2021

समाजाभिमुख काम करताना तात्यांचे जनतेसाठी मोठे योगदान ः सभापती दाते

 समाजाभिमुख काम करताना तात्यांचे जनतेसाठी मोठे योगदान ः सभापती दाते

जयसिंग बढे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन...!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः
जयसिंग बढे यांनी पदांच्या माध्यमातून समाजाभिमुख काम केले असून आजच्या युवकांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केले आहे, गुणोरे गावचे माजी सरपंच जयसिंग तात्या बढे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गुणोरे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन मा आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सभापती काशिनाथ दाते सर, सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गावच्या माजी सरपंच चंद्रभागा जयसिंगराव बढे यांच्या वतीने जयसिंग तात्या बढे यांच्या स्मरणार्थ पाच लाख रुपयांचे पेव्हिंग ब्लॉक दशक्रिया विधी घाट परिसरातील खाशाबा मंदीर परिसरात बसवण्यात आले. यावेळी राहुल पाटील शिंदे, जिल्हा परिषद माजी सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी सभापती सुदाम पवार, संजय गांधी निराधार समीतीचे अध्यक्ष ठकाराम लंके, माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, माजी उपसरपंच सोपान भाकरे, गुणोरे गावचे सरपंच बाळासाहेब खोसे, उपसरपंच कचरंशेठ कारखिले, जनसमृध्दी पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र मेसे व्हा.चेअरमन भाऊसाहेब बढे व त्यांचे सर्व संचालक मंडळ, मुख्य व्यवस्थापक राजेश गोपाळे, पारनेर परिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर, सुहास शेळके, ज्ञानदेव कारखीले सर, बाजीराव गोपाळे, कारभारी मेसे, सबाजी मेसे, भाऊ किसन गोपाळे सर, आबा रासकर महेंद्र बढे, आम्ही गुणोरेकर फाऊंडेशन चे अध्यक्ष विकास बढे, मंगेश सालके, किसनराव सुपेकर, दादाभाऊ निमोणकर, माजी सरपंच पोपटराव कारखीले, माजी सरपंच बाळासाहेब दिघे, बाप्पु दिघे सर, सखाराम आढाव, सुरेश काणे, तंटामुक्ती उपाध्यक्ष भाऊसाहेब बढे, अण्णासाहेब बढे, सुभाष खोसे आदी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते, महेंद्र बढे सरांच्या आठवणीतले तात्या एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व या भावनीक ऑडिओ क्लीप ने उपस्थितांचे मन भारावून गेले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जयसिंग बढे यांच्या कार्याचे कौतुक करीत बढे तात्या यांच्या सामाजिक कार्याचे अनुकरण आजच्या युवकांनी करण्याची गरज असल्याचे सांगितले. बढे तात्या यांनी ग्रामविकास करताना गावकर्‍यांना संघटीत करीत प्रत्तेक क्षेत्रात ग्रामविकासाचे मोठे काम केले आहे. समाजाभिमुख काम करताना तात्यांचे गाव व परिसरातील जनतेसाठी मोठे योगदान असून अशाप्रकारे काम आजच्या तरुणाईकडून अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया उपस्थीतांकडून यावेळी व्यक्त होत होती.

No comments:

Post a Comment