पथदिवे बंद नागरिक अंधारात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 8, 2021

पथदिवे बंद नागरिक अंधारात.

 पथदिवे बंद नागरिक अंधारात.

नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या घराभोवती लखलखाट.
नागरिकांच्या दारात अंधार!


पारनेर -
पारनेर नगर पंचायत पथदिव्यांचा प्रश्न गंभीर झाला असून नागरिकांनी याबाबत नगरपंचायत कार्यालयांमध्ये उपोषण केले आहे आळकुटी रोड सिद्धेश्वर वाडी रोड चेडे मळा पुणे वाडी फाटा पथदिवे अनेक दिवसापासून नादुरुस्त आहेत या कारणाने नागरिकांनी थेट नगरपंचायत मध्ये दि.७ रोजी पासून उपोषण सुरू केले आहे.
यावेळी नागरिकांनी मागणी केली आहे की जेव्हापासून पारनेर नगरपंचायतीचे अस्तित्वात आली आहे तेव्हापासून जे पथदिवे बसवण्यात आले आहेत ते बंद आहेत यामध्ये आळकुटी रोड चेडे मळा सिद्धेश्वर वाडी रोड या ठिकाणी मागील काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे तसेच हिंस्र प्राण्यांच्या धोका या भागामध्ये आहे येथे शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे लोडशेडिंग असल्या असल्याकारणाने रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शेतमालाला पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे हिंस्त्र प्राण्यांचा त्यांना सामना होतो म्हणून सदरील भागातील पथदिवे दुरुस्त करणे गरजेचे आहे तसेच या भागात चोरीचे प्रमाण अलीकडील काळामध्ये वाढले आहे याबाबत अनेक वेळा तोंडी तक्रार करूनही तेथील नगरसेवकांनी दखल घेतली नाही नगर पंचायत पाणी लाईट बिल सर्वांचे पैसे जनतेकडून घेते मात्र ती जनता अंधारात असेल तर काय असा सवाल उपस्थित केला त्याचबरोबर गणेश उत्सव जवळ आलेला असताना या भागातील स्टेट लाईट लवकरात लवकर सुरू व्हाव्यात अशी मागणी संबंधित नागरिकांनी केली आहे नगरपंचायतीने पथदिवे फक्त जनतेच्या उपयोगासाठी आहेत का वाड्या वस्त्यांवरील सर्व पथदिवे बंद होतात ते चालू करायला व त्याचा खर्च करायला नगरपंचायत कडे निधी नाही मात्र मोठाल्या नेत्यावर नगरसेवकांच्या घराजवळील व्यवसायिकांच्या पथदिवे वेळोवेळी चालू होतात ही खंत देखील जनतेच्या मनात आहे सामान्य जनता अंधारात असताना त्याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष घालावे या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात आले आहे या आशयाचे पत्र संदीप औटी यांनी पारनेर तहसील कार्यालय पोलीस स्टेशन नगरपंचायत यांना दिले त्यानुसार त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

No comments:

Post a Comment