राज्यात सर्वप्रथम 'मिशन वात्सल्य' बैठक नेवाशात संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 8, 2021

राज्यात सर्वप्रथम 'मिशन वात्सल्य' बैठक नेवाशात संपन्न.

 राज्यात सर्वप्रथम 'मिशन वात्सल्य' बैठक नेवाशात संपन्न.

कोरोना विधवांच्या योजना प्राधान्याने राबवा - तहसीलदार


नेवासा - 
नेवासा तालुक्याची मिशन वात्सल्य बैठक अध्यक्ष तथा तहशिलदार रुपेश सुराणा यांचे अध्यक्षतेखाली नेवासा पंचायत समिती सभागृहात दि. ७ रोजी पार पडली . कोरोना मुळे एकल ( विधवा ) झालेल्या महिला व त्यांच्या बालकांच्या योजना प्राधान्याने राबविणेचे आदेश तहशिलदार सुराणा यांनी बैठकीत दिले . राज्यात सर्वप्रथम नेवासा तालुक्याची बैठक पार पडली. 
बैठकीस बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा  समिती सचिव सोपानराव ढाकणे , गट विकास आधिकारी शेखर शेलार , तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सुर्यवंशी , गट शिक्षण अधिकारी सुलोचना पटारे , महिला संरक्षण अधिकारी जगदिश शिरसाठ व कृषि विस्तार अधिकारी बाळासाहेब कासार , कोरोना एकल महिला जिल्हा समन्वयक अशोक कुटे , तालुका समन्वयक कारभारी गरड ,भारत आरगडे ,  प्रा. शिक्षक समितीचे  जिल्हा कार्याध्यक्ष भास्करराव नरसाळे उपस्थित होते.
 कोरोनामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्युमुळे एकल ( विधवा )झालेल्या महिला व त्यांच्या मुलांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन , त्यांना विविध कल्याणकारी योजना मिळण्यासाठी 'शासन आपल्या दारी' या संकल्पनेवर आधारीत एकल महिला पुनर्वसन समितीच्या मागणीनुसार 'मिशन वात्सल्य' ही योजना शासनाने सुरू केली आहे. ह्या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या शासन आदेशानुसार तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समिती गठीत करण्यात आली आहे.  या समितीच्या झालेल्या बैठाकीत शासन आदेशान्वये गाव पातळीवरील पथकाद्वारे कोरोना बाधीत कुटुंबातील महिला व मुलांचे सर्वेक्षण करणे , त्यांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचे प्रस्ताव तालुकास्तरावर पाठविणे , वात्सल्य समिती मार्फत तालुकास्तरावरील संबंधित कार्यालायाकडुन मंजुरी घेणे , जिल्हास्तरीय मंजुरी आवश्यक असेल तर तेथे पाठविणे व पाठपुरावा करणे . 
महिलांसाठी संजय गांधी निराधार यासह असणाऱ्या विविध वयोगटातील योजना ,  मुलांसाठी बाल संगोपन योजना ,  दारिद्रय रेषेखाली असणा-या महिलेस राष्ट्रिय कुटुंब लाभ योजना यासह,विविध योजनांचे लाभ देणे शैक्षणिक अडचणी सोडविणे , गावपातळीवर असणा-या विविध योजनेत प्राधान्य देणे , उद्योग - व्यवसाय सुरु करणेसाठी प्रशिक्षण कर्ज प्रकरणे आनुदान आदिंबाबत सहकार्य देण्याचे अध्यक्ष रुपेश सुराणा व सचिव सोपानराव ढाकणे यांनी आश्वासन दिले.  
मयत पतीच्या नावावरील घर , जमिन यांची वारस नोंद तातडीने करणे , विभक्त किंवा नविन शिधापत्रिका वर रेशनचे धान्य लगेच सुरु करणे , महसुल , कृषि , महिला बाल कल्याण च्यासर्व योजनां व आवश्यक कागदपत्र ,  निकष यांची एकत्रीतपणे पुस्तिका करणे  बाल संगोपन कॕम्प नेवासा येथे घेणे आदि सुचना कोरोना एकल महिला समितीचे समन्वयक तथा वात्सल्य समिती सदस्य कारभारी गरड यांनी केल्या. जिल्हा समन्वयक अशोक कुटे यांनी महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या कामांची माहिती देऊन सेवाभावी संस्थे मार्फत मिळणाऱ्या योजनां , उपक्रमाबाबात सांगितले . समन्वयक व वात्सल्य समिती सदस्य भारत आरगडे , प्रा, शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्करराव नरसाळे यांनी कोरोना बाधित कुटुंबास येणाऱ्या विविध अडचणी व समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.

No comments:

Post a Comment