रेखा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 3, 2021

रेखा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता.

 रेखा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता.

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या वकीलाचा न्यायालयासमोर युक्तिवाद.


अहमदनगर -
रेखा जरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याने आपल्या वकिलांमार्फत माझा रेखा जर यांना मारण्याचा उद्देश नव्हता असे स्पष्टीकरण दिले आहे. जामीन अर्जावरील सुनावणीत अ‍ॅड. महेश तवले यांनी मांडले. बोठेच्या जामीन अर्जावरील आज सुनावणी झाली. अर्जावरील निर्णय मंगळवारी (दि. 7) होणार आहे.
रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयात 14 जुलै रोजी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केेला आहे. बोठेच्या जामीन अर्जावर याआधी सरकार पक्षाने म्हणणे मांडले आहे. आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान बोठेच्या वकिलांनी म्हणणे मांडले. बोठे याचा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता, तसेच पोलिसांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून बोठे याला आरोपी म्हणून घोषित केले आहे. इतर गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिस घाईघाईने कोर्टात आरोपीला फरार घोषित करण्याची प्रक्रिया राबवत नाहीत; मात्र या प्रकरणात पोलिसांनी खूप घाईघाईने फरार घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तसेच म्हणणे मांडतेवेळी बोठेच्या वकिलांनी मयत जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी आरोपी बोठेविरोधात दिलेल्या अर्जांचा देखील उल्लेख केला. बोठे यांचा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता, असे म्हणणे बोठेच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडले.
आरोपी सागर भिंगारदिवे याचे नाव बोठे यांनी हनीट्रॅपच्या चालविलेल्या वृत्त मालिकेत होते. असे असताना बोठे भिंगारदिवेला सुपारी का देतील, असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. न्यायालयासमोर याआधी सरकारपक्षाने बाजू मांडली असून शुक्रवारी आरोपीतर्फे देखील बाजू मांडण्यात आली आहे. मंगळवारी न्यायालय बोठेच्या जामीन अर्जावर निर्णय जाहीर करणार आहे.

No comments:

Post a Comment