तो एक राजहंस होता. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 3, 2021

तो एक राजहंस होता.

 तो एक राजहंस होता.

शरदराव (भाऊ) मुरलीधर तोडमल पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण श्रध्दांजली.


सो
मवार दि.17/8/2020 ची ती भयाण रात्र होतीआणि मंगळवार दि.18/8/2020 ची ती सकाळ होती. वाकोडी आणि वाकोडी पंचक्रोशीतील व्यक्ती न व्यक्ती,लहान बालके, मोठे, वयोवृध्द सुन्न सुन्न होते. कोणीच कोणाशी काहीच एक शब्दही बोलत नव्हते.कित्येकांच्या आसवांचा बांध फुटला होता. त्यादिवशीची ती सकाळ नव्हती. पाखरे चिमण्या किलबिल करत नव्हत्या.काळोख आणि काळोख पसरला होता. काळ आला होता आणि संपुर्ण कुटुंब, आप्तेष्ट, गाव आणि पंचक्रोशीतील सर्वांमधून आमच्या प्राणप्रिय भाऊंना घेऊन गेला होता.
आमचा सखा, आमचा सारथी, आमचा कैवारी, आमचा विकासपुरुष, आमचा नेता, आमचा राजा, राजासारखं मन आणि मनासारखा राजा असलेले आमचे भाऊ अधुरी एक कहानी टाकून आम्हाला पोरके करुन गेले. आज एक वर्ष होत असताना त्यांच्या स्मृतींनी वाकोडी गाव व पंचक्रोशी तालुका व जिल्ह्यावर अंत्यकळा पसरली.
जे दु:ख ज्ञानेश्वर माऊलींना समाधी घेताना आळंदीकरांना झाले असेल, संत तुकारामांचे वैकुंठगमन होताना देहुकरांना झाले असेल, तेच दु:ख वाकोडीकरांना,आप्तेष्टांना झाले होते आणि त्याची धग आजही कमी झाली नाही.
भाऊ आमच्यासाठी जर महाभारत असेल तर माउली ताई अर्जुनााच्या रुपात आहेत.समोरुन त्या आव्हानांचा सामना करत आहेत.मात्र श्रीकृष्णरुपी मार्गदर्शक भाऊ केवळ पाठीशी असणेही आम्हा लेकरांच्या पाठिंब्याच्या बरोबर होतं.
भाऊ म्हणजे साक्षात कल्पवृक्ष.कोणती गोष्ट बोलावी आणि ती त्यांना  माहिती नसावी म्हणजेच आश्चर्य . या कल्पवृक्षाला झावळयांचे छप्पर त्यांची सावली तशी आमची सावली कायमची हरपली.
परमेश्वर जेव्हा खुप आांदात असेल,आणि तेव्हा तो एखादया आत्म्याची निर्मिती करित असेल तर त्या आत्म्यात त्याचेच अनेक गुण येत असतील तर असा आत्मा कोटीत एखादा असेल तर तो आत्मा म्हणजे आमचे शरदभाउ. आमचे भाउ लाखात एक होते आणि ते नेक होते.
लोकल ते ग्लोबल नेता शेती व्यवसायाबरोबरच राजकीय वारसा असल्याने चावडीतल्या विषयापासून तालुका, जिल्हा, राज्यामध्ये चालणार्‍या विषयांमध्ये समज असणारा ज्ञानयोगी केवळ पोकळ बढाया मारण्यापेक्षा आपल्या कार्यकौशल्य कामातून संदेश देणारा निष्ठावंत कर्मयोगी होता...
दलाई लामापासून ते कुठल्याही लहान कार्यकर्त्यासोबत तेवढेच प्रेम,आदरभाव जिव्हाळ्याचे बोलणारा सच्चा साथी आम्हा लेकरांच्यासाठी साक्षात प्रेमाचा स्त्रोत होता.
व्यक्ती एक पण रुपे अनेक असे आमचे भाऊ. धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय विशेष करुन शैक्षणिक क्षेत्रातील राजहंस होता...पण या सगळ्यात असूनसुध्दा रंगुनी रंगात रंग माझा वेगळा म्हणजे स्वत:चे स्वपण जपणारा विचारवंत होता.
असा माणूस म्हणजे म्हणजे केवळ एका परिवाराची हानी नसते, तर ती समाजाची, राज्याची हानी असते. कधी वाटते हा दिवस आठवणींच्या पटलावरून पुसता आला असता तर किती बरे झाले असते. आमचे भाऊ कोठेही गेलेले नाहीत त्यांचे दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाने ते सदैव आपल्यात आहेत. अशा या महान कर्मयोध्द्यास त्रिवार अभिवादन आणि त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली...

No comments:

Post a Comment