किंमतशून्य व्यक्तींचे प्रसिध्दीसाठी आरोप ! - आ.संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 3, 2021

किंमतशून्य व्यक्तींचे प्रसिध्दीसाठी आरोप ! - आ.संग्राम जगताप

 किंमतशून्य व्यक्तींचे प्रसिध्दीसाठी आरोप ! - आ.संग्राम जगताप

आयटी पार्क हे राजकीय व्यासपीठ नाही...

एमआयडीसीतील आयटी पार्कवरून आ. संग्राम जगताप व काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंमध्ये आरोप-प्रत्यारोप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आयटी पार्क हे राजकीय व्यासपीठ नाही ज्यांना कोणाला या आयटी पार्कमध्ये कंपन्या आणायचे असतील त्यांनी आणाव्यात व काम सुरू करून युवकांना रोजगार उपलब्ध करून दयावा.आयटी पार्कच्या शेजारीच आयटी पार्क आरक्षित भूखंड शिल्लक आहे या ठिकाणी इच्छुकांनी आयटी पार्क सुरू करावे मी लावलेल्या आयटी पार्कच्या छोट्याश्या रोपट्याचे कामाच्या माध्यमातून वट वृक्ष करणार आहे.समाजामध्ये किंमत नसणारे लोक माझ्यावर आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचे काम करत आहे,आयटी पार्कमध्ये आठ ते दहा जणांनी जाऊन दहशत माजवली आहे. हा आयटी पार्क बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या युवक व युवती भयभीत झाल्या आहेत अस सांगत आ. संग्राम जगताप यांनी कॉग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या आरोपांना पत्रकार परीषदेत प्रत्युत्तर दिले आहे.
याप्रसंगी आ. जगताप पुढे म्हणाले की नगर शहरातील तरुणांचे विविध प्रश्न प्रलंबित आहे. शहरातील व जिल्ह्यातील युवक बाहेर जाऊन काम करीत आहेत. नगर शहरामध्ये त्यांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला यामध्ये मी माझे यश समजतो. नगर शहरामध्ये आयटीचे ब्रँडिंग झाले पाहिजे भीतीचे वातावरण पसरून ते होणार नाही. 20 वर्षापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै.पतंगराव कदम यांनी उद्योगमंत्री असताना नगर शहरातील एमआयडीसी मध्ये आयटी पार्कची उभारणी केली होती. तेव्हा पासुन ते 2019 पर्यत म्हणजेच 20 वर्ष हे आयटी पार्क धूळखात पडले होते.याठिकाणी इमारतीच्या काचा फुटलेल्या, फरशा तुटलेल्या,पावसात गळणारी इमारत,मोठ मोठे मोहोळ , तसेच सदर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते.  लाईटची कुठलीही व्यवस्था नसणारे ठिकाण होते. एमआयडीसी विभागाने या आयटी पार्कमधील ऑफिसेस खाजगी व्यवसायिकांना विकले आहे.2016 पासून माझ्या मनात या ठिकाणी आयटी पार्क उभे रहावे अशी संकल्पना होती. व 2019 मध्ये या ठिकाणी आयटी पार्क च्या रूपाने छोटासा वृक्ष लावण्याचा प्रयत्न मी केला. नगर शहरासह जिल्ह्यातील युवकांच्या हाताला रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून मी पावले उचलले व स्टार्टअप कंपन्यांमधून सुरवात केली.गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या लॉकडाउन काळामध्ये देशात विविध उद्योगधंदे बंद पडले,तरुणांच्या हाताचा रोजगार गेला विविध प्रकारची रोजगाराची संकटे आज युवकांवर आहेत.पुणे शहर आयटी हब म्हणून ओळखले जात आहे. या ठिकाणी सुद्धा अनेक युवकांना आपला रोजगार गमावावा लागला तर काही वर्क फ्रॉम होम म्हणून काम करत आहे.परंतु नगरच्या छोट्याश्या आयटी पार्कने युवक युवतींच्या हाताला काम दिले आहे. काहींचा उद्देश आयटी पार्क बंद पाडण्याचा आहे परंतु नगरची जनता सुज्ञ असून ही जनता काम करणार्‍याच्या पाठीमागे उभी आहे. आता ते दिवस राहिले नाही जे पूर्वी आरोप करून फक्त मते मिळवायचे आता नगरची जनता काम करणार्‍याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहते.
उपमहापौर गणेश भोसले यांनी सांगितले की, नगर शहराचे कर्तव्यदक्ष आ.संग्राम जगताप यांनी कामाच्या माध्यमातून आपला ठसा उमटविला आहे. मुंबई-पुणे येथे जाऊन स्टार्टअप कंपन्यांशी बोलणी करून आयटी पार्कच्या रूपाने छोटेसे रोपटे लावले हे वटवृक्ष  करण्याची सर्व पक्षांची जबाबदारी आहे  सर्वांनी पाणी,खत घातल्यावर आपल्या शहरातील व जिल्ह्यातील युवकांना रोजगाराचे फळ मिळणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम कराव.े आयटी पार्क बंद पाडण्यासाठी पुढे येऊ नये व विकासात राजकारण आणू नये असा आरोप उपमहापौर गणेश भोसले यांनी केला यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, शहराध्यक्ष माणिकराव विधाते आदी उपस्थित होते.
 आयटी पार्क मधील काम करणार्‍या युवतींनी आज पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन आमचे संरक्षण करा अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली काल दि.2 सप्टेंबर रोजी एमआयडीसीमधील आयटी पार्क मध्ये आठ ते दहा जणांनी येऊन भीतीचे वातावरण निर्माण केले होते. आम्ही सर्वजण भीतीच्या सावटाखाली आहे. आमचे पालक कामावर  जाण्यास नकार देत आहेत. त्यामुळे आम्हाला आयटी पार्कमध्ये पोलीस संरक्षण द्यावे व अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे काम करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत आयटी पार्कमध्ये नवीन कंपन्या येण्यास तयार होणार नाही, पर्यायाने सर्व मुला-मुलींना रोजगारासाठी बाहेर गावी जावे लागेल तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आळा बसवणे गरजेचे आहे तरी आम्हला संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे आयटी पार्क मधील युवतींनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here