स्मार्ट एलईडी पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागणार; दिवाळी पूर्वी नगर शहर पथदिव्याने उजळणार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 2, 2021

स्मार्ट एलईडी पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागणार; दिवाळी पूर्वी नगर शहर पथदिव्याने उजळणार.

 स्मार्ट एलईडी पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागणार; दिवाळी पूर्वी नगर शहर पथदिव्याने उजळणार.

शहरातील पथदिव्यांचा विषय ऐरणीवर...
उद्या स्थायी समितीची ऑनलाइन सभा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः उद्या शुक्रवार (दि 3) रोजी महापालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन सभा होणार असून या सभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. पाणीपुरवठा विभागात कंत्राटी करारानुसार कर्मचार्‍यांया नियुक्त्या अमृत योजना अंतर्गत पाणीपुरवठा योजना, शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न इ विषयांवर चर्चा होणार असून शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा स्मार्ट एलईडी पथदिवे बसविणे व देखभाल दुरुस्तीची निविदा मंंजुरीसाठी स्थायी समितीसमोर येणार आहे काही विषयांवरून सभेत वादळी वादंग होण्याची शक्यता आहे.
स्थायीच्या सभेपुढे विविध विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये कर्मचारी नियुक्ती, रस्ता दुरुस्ती तसेच नागरी समस्यांचा समावेश आहे. महापालिका पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवेसाठी कंत्राटी करारानुसार तात्पुरत्या स्वरूपात कनिष्ठ अभियंता तसेच इतर पदावर मानधनावर नेमणूक करणे, कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात अत्यावश्यक सेवेसाठी करारानुसार तात्पुरत्या स्वरूपात परिचारिका नियुक्ती, महापालिकेच्या इलेक्ट्रिकल विभागात कर्मचारी नियुक्ती, महापालिकेचे दवाखान, रक्तपेढीत आवश्यक असणारी सर्व औषधे, रसायने, वैद्यकीय साहित्य व उपकरणांचे वार्षिक निविदांवर चर्चा महापालिका हद्दीतील व उपनगरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मार्गाचे पॅचींग करण्यासाठी निविेदे बाबत चर्चा, आदी विषय चर्चिले जाणार आहे अमृत अभियानांतर्गत शहर पाणी पुरवठा योजनेबाबत चर्चा, महापालिका हद्दीतील मोकाट जनावरे पकडणे व त्यांचा चारा पाणी, औषधोपचार तसेच देखभालीसाठी संस्थांची निर्मिती करणे, प्रोफेसर कॉलनी चौक ते सावेडी येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केट येथे एम आर आय मशीन अँड सिटी स्कॅन सेंटर विकसित करण्यासाठी कामे करणे, मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी बुरूडगाव येथे असणारे डेड अ‍ॅनिमल इन्सिनरेटर प्रकल्प एक वर्षासाठी चालविण्यास देण्याबाबत निविदा, शहरात एलईडी पथदिवे बसविणे, प्रभाग सहा मधील रासने नगर, सिद्धार्थ विनायक कॉलनी, सावेडी गावठान, बालिकाश्रम रोड ,स्टेट बँक कॉलनी, सावेडी नाका परिसरात जलनिस्सारण व पेविंग ब्लॉक बसविण्यासाठी निवडीबाबत चर्चा, प्रभाग सतरा मधील केडगाव उपनगरातील सोनेवाडी रोड ते पाण्याच्या टाकी लगत ते लोंढे घरापासून बिरोबा मंदिराकडे जाणारा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण यासाठी निविदा, प्रभाग 5 मधील कुष्ठधाम येथील ओढा सुशोभीकरण ,रस्ते काँक्रिटीकरण तसेच इतर अर्जदार आणि विविध विषयांवर चर्चा होणार आहे
 शहरामध्ये सुमारे 35 ते 40 हजार पथदिवे असून यापैकी सुमारे 30 ते 40 टक्के पथदिवे बंद आहेत. त्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अंधाराचा फायदा घेवून  चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरीक हवालदिल झाले आहेत. त्यांच्या तक्रारीचे प्रमाण दिवसे दिवस वाढत आहे. मनपावर विविध सामाजिक संघटना, नागरिक आंदोलने, मोर्चे व निवेदन घेवून येत आहे. पदाधिकारी व प्रशासन यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. मनपाच्या आर्थिक परिस्थिती अभावी वेळेवर विद्युत साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे पथदिवे दुरूस्त होत नाही. त्यामुळे अनेक दिवस परिसरामध्ये अंधाराचे साम्राज्य राहते. मनपाला वर्षभरात विद्युत साहित्य देखभाल करिता 80 लाख रूपये खर्च येत आहे. त्याच प्रमाणे विद्युत वाहनासाठी कर्मचार्‍यांच्या खर्चापोटी वर्षभरासाठी 30 लाख खर्च येत आहे. एकूण 1 कोटी 10 लाख खर्च येत आहे. तरी मनपाचे आर्थिक हिताचा विचार करता स्मार्ट एलईडी पथदिव्याचा प्रकल्प राबविल्यावर मनपाची मोठया प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे. तसेच मनपाला दरमहा 7 लाख रूपये विज बचतीच्या संबंधीत कंपनीकडून मिळणार आहे. याच बरोबर नागरिकांच्या तक्रारी नंतर पथदिवे बंद असल्यास कंपनीकडून तात्काळ नविन पथदिवे बसविणार आहे.

स्मार्ट एलईडी प्रकल्पामुळे शहराच्या कचर्‍या प्रमाणेच पथदिव्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या कामासाठी महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले आयुक्त शंकर गोरे, प्रकल्प अभियंता आर.जी.मेहेत्रे यांचे सहकार्य लाभले आहे. आता सणासुदीचे दिवस सुरू होत असून दिवाळीपूर्वी आपले शहर विद्युत पथदिव्यांनी उजळणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागताना मला मनस्वी आनंद होत आहे.
- अविनाश घुले, सभापती स्थायी समिती

No comments:

Post a Comment