उद्योगमंत्री सुभाष देसाई व ना. शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत उद्या भूमिपूजन समारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 2, 2021

उद्योगमंत्री सुभाष देसाई व ना. शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत उद्या भूमिपूजन समारंभ

 उद्योगमंत्री सुभाष देसाई व ना. शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत उद्या भूमिपूजन समारंभ

सोनई ते घोडेगाव रस्त्यासाठी गडाखांच्या प्रयत्नातून 6 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

सोनई ः नेवासा तालुक्यातील सोनई ते घोडेगाव या रस्त्याच्या रुंदीकरण कामासाठी ना  शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नाने 6 कोटी 40 लक्ष रुपयांचा  निधी  मंजूर करण्यात आला आहे.या  रस्त्याचे रुंदीकरण ,डांबरीकरणाचे काम या माध्यमातून होणार आहे या कामाचे भूमिपूजन शुक्र दि 3 सप्टेंबर 2021  रोजी साय 5 वाजता नगर-औरंगाबाद महामार्गावरील  शनी चौक घोडेगाव ता नेवासा   येथे होणार आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे शुभहस्ते  कामाचे भुमिपुजन संपन्न होणार आहे  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना शंकररावजी गडाख असणार आहेत. हा रस्ता डांबरीकरण कारपेट सिलकोटसह होणार आहे,ठीक ठिकाणी ओढ्यावर स्लॅब कल्व्हर्ट(छोटे पूल) करण्यात येणार आहे,त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याहुन पाणी वाहण्याची समस्या कायमची दुर होईल,व उर्वरित  मोर्‍याचे चे(नळकांडी पुल) रुंदीकरण करण्यात येणार आहे,संपूर्ण 8 किमी 300 मी लांबीचा रस्ता  सीलकोटसह रस्ता पूर्ण होणार आहे,रस्त्यावर आवश्यकतेनुसार माहिती फलक,वळणाचे फलक, डेलीनेटर बसवले जाणार आहेत,तसेच लेन दुभाजक पट्टेही मारले जाणार आहे, 

सदर रस्त्याची मागणी अनेक वर्षे पासून होती निवडणुकीच्या काळात ना शंकरराव गडाख दिलेला शब्द काम मंजूर करून पूर्ण केला  हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर  शनी शिंगणापूर येणारे भाविक,पर्यटकांना,स्थानिक व्यवसायिक व शेतकर्‍यांना मोठी उपलब्धता निर्माण होईल तसेच घोडेगाव व सोनई परिसरातील नागरिकांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे.रहदारीचा भाविकांचा,स्थानिक नागरिकांना रस्ता रुंद झाल्यामुळे कुठेही त्रास होणार नाही. शेकडो विद्यार्थी या रस्त्यावर प्रवास करत असतात,त्यांनाही यामुळे सुलभता प्राप्त होईल, रस्ता रुंदीकरणांची  मागणी अनेक वर्षे पासून होती मात्र ना गडाख यांनी स्वतःहून  यासाठी विशेष प्रयत्न केले व निधी मंजूर केला 

  वरील  8 किमी 300 मी  अंतरावर लहानमोठ़या प्रमाणात ओढ्यावर पूल आहे ते पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर बंद पडत त्यामुळे तासनतास वाहने उभी करावी लागत पण या रस्त्याच्या पुलाचे दुरुस्ती होणार असल्याने अडथळा येणार नाही.परिसरातील  गावातील शेतकर्‍यांना व नागरिकांना यांचा फायदा होणार आहे.सदर रस्ता काम मंजूर केल्यामुळे घोडेगाव, सोनई,पानसवाडी,शनी शिंगणापुर परिसरात नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment