महिलांना दुय्यम दर्जा देणे यापुढे देशाला परवडणारे नाही ः अ‍ॅड. गवळी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 30, 2021

महिलांना दुय्यम दर्जा देणे यापुढे देशाला परवडणारे नाही ः अ‍ॅड. गवळी

 महिलांना दुय्यम दर्जा देणे यापुढे देशाला परवडणारे नाही ः अ‍ॅड. गवळी

महिलांना सर्वच क्षेत्रात समान संधी मिळण्यासाठी महात्मा गांधीजी जयंती दिनी वन नेशन वन रिझर्वेशन सत्याग्रह

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महिलांना सर्वच क्षेत्रात पन्नास टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी वन नेशन वन रिझर्वेशन 50-50 सत्याग्रहाच्या माध्यमातून मनू तालिबानी संपविण्याची घोषणा केली जाणार आहे. वाडियापार्क क्रीडा संकुल येथे महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर हा सत्याग्रह केला जाणार असल्याची माहिती अशोक सब्बन यांनी दिली.
गेली हजारो वर्षे देशातील महिलांना दुय्यम दर्जा देण्यात आला आहे. त्यांचे सर्वच क्षेत्रात शोषण येत आहे. एकविसाव्या शतकात देखील महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. संसदेत कमी संख्येने खासदार, तर सर्वोच्च न्यायालयात फक्त तीन ते चार महिला न्यायाधीश काम करतात. यापूर्वी निम्नस्तरीय सरकारी नोकरी मध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण देण्यात आले होते. परंतु त्यातून महिलांचा आर्थिक, शैक्षणिक, राजकीय विकास खर्या अर्थाने होऊ शकलेला नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग 50 टक्के पेक्षा नक्कीच जास्त आहे. पुरुषापेक्षा कोणत्याही क्षेत्रात महिला कमी नाहीत, असे असताना मनु तालिबानी प्रवृत्तीमुळे महिलांना दुय्यम दर्जा दिला जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
महिलांना दुय्यम दर्जा देऊन देशात अर्धांगवायु पोसण्यात आला. यामुळे वन नेशन, वन रिझर्वेशन 50-50  ची अंमलबजावणी लागू करून महिलांना देशातील सर्व क्षेत्रात पुरुषांबरोबर काम करण्याची आणि उन्नती करायची संधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेने आंदोलन सुरू केले असल्याचे स्पष्ट केले आहे. जगभर विशेषतः तालिबान, चीन, पाकिस्तान या ठिकाणी महिलांचे शोषण फार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा वेळी लोकशाही प्रगत असलेल्या भारतामध्ये महिलांना समान दर्जा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. महिलांनी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये फार मोठी प्रगती केली आहे. शाळा-कॉलेजमध्ये शिक्षिका आणि प्राध्यापिका म्हणून महिलांचा सहभाग मोठा आहे. नवीन पिढी घडविण्यात महिलांचा सहभाग 80 टक्के पेक्षा जास्त असतो. अशा परिस्थितीमध्ये महिलांना दुय्यम दर्जा देणे यापुढे देशाला परवडणारे नसल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. महिलांना समाजात समान संधी मिळवून देण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला असून, यासाठी गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, वीरबहादूर प्रजापती, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here