तालुका दूध संघाच्या नऊ संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

तालुका दूध संघाच्या नऊ संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 तालुका दूध संघाच्या नऊ संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश


नगरी दवंडी / प्रतिनिधी
अहमदनगर - अहमदनगर तालुका सहकारी दुध व्यवसाय व प्रक्रिया संघाच्या नऊ संचालकांनी चेअरमनच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
दुध संघाची देऊळगाव सिध्दी येथे वार्षीक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पाडली. सभेत  राष्ट्रवादी मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय झाला. यासाठी रोहीदास कर्डीले, केशव बेरड, गोरख सुपेकर, किसन लोटके यांनी पुढाकार घेतला. प्रवेश केलेल्यांमध्ये  मोहन तवले, भाऊसाहेब काळे, गोरक्षनाथ काळे, बजरंग, पाडळकर , रामदास शेळके, पुष्ण कोठुळे, वैषाली मते, राजाराम धामणे , स्वप्नील बुलाखे यांचा समावेश आहे. यावेळी ना. प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके , जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रताप ठाकणे, घनश्याम शेलार , गेंविद मोकाटे , किसनराव लोटके , रोहिदास कर्डीले, केशव बेरड , शरद पवार, प्रकाश पोटे , गोरख सुपेकर, गुलाब काळे, निखील शेलार , गजानन खरपुडे . दत्तात्रय डोकडे उपस्थित होते
 संघाचे चेअरमन यांच्या मनमानी कारभाराला कटांळून आम्ही नऊ संचालकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला . गेल्या दहा वर्षापासून दुध संघाला अडचणीचा सामना करावा लागत आहे . तालुक्याचे विभाजन झाल्यामुळे .महाविकास आघाडीची सत्ता आहे.ना प्राजक्त तनपुरे , आ. निलेश लंके , घनश्याम शेलार यांच्यामुळे तालुक्यात दुध संघ पुन्हा उदयास येणार . यामुळेहा निर्णय घेतला असल्याचे भाऊसाहेब काळे यांनी सांगीतले
 मधुकर मगर, गुलाब कार्ले,संचालकांनी राजीनामे दिले आहे.

No comments:

Post a Comment