पतसंस्थेचा उत्कर्ष डोळयासमोर ठेऊन सभासदांना चार कोटी डिव्हिडंटचे वाटप करणार ः बनसोडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

पतसंस्थेचा उत्कर्ष डोळयासमोर ठेऊन सभासदांना चार कोटी डिव्हिडंटचे वाटप करणार ः बनसोडे

पतसंस्थेचा उत्कर्ष डोळयासमोर ठेऊन सभासदांना चार कोटी डिव्हिडंटचे वाटप करणार ः बनसोडे 

छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेने आतापर्यंत संचालक मंडळ व सभासदांना विश्वासात घेऊन काम केले आहे. त्यामुळे पतसंस्थेची उत्कर्षाकडे वाटचाल सुरू झाली आहे. सहा टक्के व्याजदराने पतसंस्था सभासदांना कर्ज उपलब्ध करून देत आहे. सद्या 52 कोटी पन्नास लाख इतक्या ठेवी झाल्या असून सन 2020- 21 या आर्थिक वर्षात 88 लाख नफा झाला असल्याचे सांगून, त्यांनी लवकरच अहमदनगर शहराच्या वैभवात भर घालणार्या इमारतीचे भूमिपूजन होऊन बांधकामास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले. सभासदांचे हित व पतसंस्थेचा उत्कर्ष हेच उद्दिष्ट डोळयासमोर ठेऊन सभासदांना चार कोटी रुपये डिव्हिडंटच्या स्वरूपात वाटप करण्याचा निर्धार पतसंस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
अहमदनगर येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा  नुकतीच पतसंस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिकराव भगत, पतसंस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, मानद सचिव चंद्रकांत तापकीर, संचालक प्रमोद कानडे, सुरेश मंडलिक, दादासाहेब शेळके, सुरेश खरड, प्रशांत सातपुते, श्रीमती सुनीता बर्वे, किशोर जेजुरकर, राजेंद्र बागले, श्रीमती अर्चना कडू, रामदास जाधव, जयराम ठुबे, दादासाहेब डौले, संजय गवळी, बाळासाहेब मेहेत्रे,संजय गिर्हे, अरुण गाढवे, अशोक जगदाळे, सुभाष गोसावी हे संचालक सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी राजेंद्र शेडाळे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून मागील सभेचे इतिवृत्त सादर केले. यावेळी आर्थिक मंजुरी अहवाल वाचन झाल्यानंतर त्यास सभासदांच्या आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली. यावेळी ऑनलाईन पद्धतीने झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी आपल्या भावना व्यक्त करून पतसंस्थेने घेतलेल्या सभासदांच्या हितावह निर्णयाचे स्वागत केले. या प्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, मानद सचिव चंद्रकांत तापकीर, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिकराव भगत यांनी मनोगत व्यक्त करत सर्व सभासदांना मार्गदर्शन केले. तर संचालक अशोक जगदाळे यांनी आभार मानले. यावेळी सेक्रेटरी पवनकुमार घिगे, सुरेश निनावे आदिंनी परिश्रम घेतले.
अहमदनगर शहराच्या वैभवात भर घालेल अशा नियोजित छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन दि.15 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर करण्यात येणार असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे  यांनी जाहीर केले. या निर्णयाचे सभासदांनी ऑनलाइनद्वारे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

No comments:

Post a Comment