फी न भरल्यामुळे... ऑनलाइन शिक्षण बंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, August 12, 2021

फी न भरल्यामुळे... ऑनलाइन शिक्षण बंद.

 फी न भरल्यामुळे... ऑनलाइन शिक्षण बंद.

चासमधील रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजकडून..
मनसेचा आंदोलनाचा इशारा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः “जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट”या चास च्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे त्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत मनसेचे सचिव नितीन भूतारे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मनसेच्या वतीने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे उपकेंद्रातील उपसंचालकांनी फी कमी करून ऑनलाइन शिक्षण सुरू करावे याबाबत निवेदन देऊन हा प्रश्न न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने या कॉलेजकडून फी साठी तगादा लावला जातो शिक्षण बंद केले जाते मग शासनाच्या नियमानुसार लॉकडाऊन काळात फी वाढ करायची नाही परंतु कॉलेजने मागील वर्षापासून जवळपास अकरा हजार रुपये फी वाढ कारण्यातआलेली आहे त्यामुळे हि फी वाढ रद्द करून वार्षिक फी मध्ये सुध्दा कपात करावी तसेच आज पालकांचे रोजगार बंद असल्यामुळे काही प्रमाणातरोजगार आत्ताच सुरू झाल्यामुळे जात फी कमी शासनाच्या आदेशानुसार कमी करून व टप्प्याटप्प्याने घेण्यात यावी तसेच शासन नियमाप्रमाणे फक्त टीवीशन फी घेण्यात यावी या प्रश्नावर आपण ताबडतोब लक्ष घालून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू करावे व तसेच मध्ये कपात करून सर्वसामान्य पालकांना विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अन्यथा मनसेच्या वतीने आपल्या दालनासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे यावेळी कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच मनसेचे संकेत व्यवहारे गणेश मराठे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment