शाळा सुरु करण्याचा निर्णयाला स्थगिती; टास्कफोर्स चा विरोध. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, August 12, 2021

शाळा सुरु करण्याचा निर्णयाला स्थगिती; टास्कफोर्स चा विरोध.

 शाळा सुरु करण्याचा निर्णयाला स्थगिती; टास्कफोर्स चा विरोध.

शाळा बंदच!


मुंबई ः
शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा करण्याचा निर्णय घेतला असला तरी मंत्रिमंडळ बैठकीत मात्र टास्क फोर्सशी सल्लामसलत करून शाळेबाबतचा निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार काल टास्क फोर्ससोबत प्रशासनाची बैठक पार पडली. यामध्ये टास्कफोर्सच्या सदस्यांनी शाळा सुरू करण्याची घाई करू नये. असा सल्ला देत. शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला. त्यामुळे सरकारने 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली असून आता शाळा बंदच राहणार आहेत. काल रात्री मुख्य सचिव, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि टास्क फोर्सची याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकाला स्थगिती देण्याचा निर्णय झाला.

No comments:

Post a Comment