अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, August 12, 2021

अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला..

 अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला..

चाईल्ड लाईनची सतर्कता.., सोनई पोलिसांची कार्यवाही...

तिला शिकायचं आहे, उच्च शिक्षण घेऊन आकाशाला गवसणी घालायची आहे; पुरूषापेक्षा कुणीही कमी लेखू नये, म्हणून आपलं कर्तुत्व सिद्ध करून दाखवायचं आहे परंतु पुरोगामी राज्याचं बिरूद मिरवणार्‍या महाराष्ट्रात आजही होणारे बालविवाह तिच्या पंखांना कात्री लावू पाहत असतील तर हे दुर्दैवच नाही का!  एक मुलगी शिकली तर अख्खं घर साक्षर होतं, हे वास्तव असलं तरी मुलीला डोक्याचा ताप समजणार्‍या घाणेरड्या मानसिकतेतील काही मंडळी तिला अल्पवयातच विवाह बंधनात अडकवण्याचा अपराध करीत आहेत.कोरोना काळात उदरनिर्वाहाचा प्रश्न, स्थलांतर, लॉकडाऊमुळे सतत घरात असलेल्या मुलीची चिंता, लॉकडाऊनच्या काळात लग्नाच्या खर्चात होणारी बचत अशा विविध कारणांमुळे कोरोनाच्या काळात बालविवाह वाढल्याचे पुढे आले आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नेवासा तालुक्यातील “माका” येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा काल रोजी होणारा बालविवाह चाईल्ड लाईन, सोनई पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार रद्द केला. 10 ऑगस्ट रोजी चाईल्ड लाईनच्या 1098 व्या टोल फ्री नंबरवर कॉल आल्याने या बालविवाहाची माहिती चाईल्ड लाईन ला प्राप्त झाल्याने चाईल्ड लाईन या विवाहाची दखल घेऊन सतर्कता दाखविल्याने हा बालविवाह रोखण्यात आला.
चाईल्ड लाईनला माहिती मिळताच तबडतोप कार्यवाहीसाठी सोनई पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांना पत्र पाठवून आणि फोन लावून महती दिली . ही माहिती मिळताच माका चे ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांना सदर बालविवाह ची शहानिशा करण्यास सूचना दिल्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख आणि चाईल्ड लाईनच्या केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली टीम मेंबर प्रविण कदम यांनी कार्यवाही करत अहमदनगर चे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा  महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बाल कल्याण समिती , गट विकास अधिकारी नेवासा, माका चे ग्रामसेवक यांना पत्र  व्यवहार करून बालविवाह होत असल्याची माहिती दिली. सोनई पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कर्पे यांनी काल रोजी पोलीस पथक रवाना केले. हे पथक माका चे ग्रामसेवक, सरपंच आणि पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन सदर बालविवाह असल्याची खात्री करून सदर बालविवाह प्रतिबंधक कार्यवाही करून रद्द करण्यात आला. यावेळी चाईल्ड लाईन टीम मेंबर प्रविण कदम हे सदर ग्रामसेवक आणि पोलीस यांच्याशी समन्वय साधत होते. योग्य मार्गदर्शना मुळे बालविवाह थबवण्यात यश आले. एप्रिल ते ऑगस्ट या काळात चाईल्ड लाईन कडे 48 बालविवाहांच्या तक्रारी आल्या आहेत.
जुलै मध्ये 17  बालविवाह च्या केसेस ची चाईल्ड लाईन च्या 1098 ला नोंद झाली आहे. या प्रमाणे दर महिन्याला 10 ते 15 केसेस ची माहिती मिळत आहे.  चाईल्ड लाईन बालविवाह च्या प्रकरणात अहमदनगर चाईल्ड लाईनला हस्तक्षेप करून बालविवाह थांबण्यात यश आले आहे.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात लोक परतले होते. त्यात अनेक गरीब कुटुंबांनी लग्नाचा खर्च कमी लागत असल्याने आपल्या अल्पवयीन मुलांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. तर इतरवेळी मुलींचे कमी वयात लग्न लावून देण्याचे प्रकार जास्त असतात. याचे एक कारण म्हणजे पालकांची आर्थिक स्थिती....पैसा नसल्याने अनेकवेळा गरीब पालक मुलींचे लग्न जास्त वयाच्या व्यक्तीशी लावून देतात. हा बालविवाह लावत असल्या कारणाने ब्राम्हण, मंडप वाले, आचारी, बेण्ड पथक, जे या बालविवाह सामील झाले, ज्यांनी हा विवाह लावण्याचा प्रयत्न केला व मदत केली या सर्वांकडून बालविवाह प्रतिबंधक कार्यवाही करत हमीपत्र लिहून घेतले की आम्ही परत कोणत्याही अल्पवयीन मुलीच्या म्हणजे 18वयाच्या आतील मुलीचा आणि 21 वर्षची आतील चा सुपारी घेतली जाईल व आम्ही सर्व सुपारी घेण्यापूर्वी मुला-मुलीचे वयाचे पुरावे दाखले बघितल्या शिवाय कोणताही विवाह सुपारी घेणार नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here