पालकमंत्री हसन मुश्रीफ व आ. संग्राम जगताप यांची एकल महिला समिती बरोबर सकारात्मक चर्चा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 16, 2021

पालकमंत्री हसन मुश्रीफ व आ. संग्राम जगताप यांची एकल महिला समिती बरोबर सकारात्मक चर्चा

 पालकमंत्री हसन मुश्रीफ व आ. संग्राम जगताप यांची एकल महिला समिती बरोबर सकारात्मक चर्चा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनात विधवा झालेल्या नगर जिल्ह्यातील महिलांच्या पुनर्वसनासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक कुटे यांनी आज  मा. पालकमंत्री हसन मुश्रीफ व मा. संग्राम भैय्या जगताप यांना निवेदन देऊन चर्चा केली. जिल्ह्यातील विधवा महिलांचे सर्वेक्षण करावे व जिल्ह्याच्या टास्क फोर्स मध्ये विधवांसाठी काम करणार्‍या समिती सदस्यांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे या महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा तसेच संजय गांधी निराधार योजनेत सुलभीकरण आणावे अशा प्रमुख मागण्या होत्या. या मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे  समन्वयक  अशोक कुटे सर, सामाजिक कार्यकर्ते युवराज गुंड, नकुल कुटे हे उपस्थित होते. या संवेदनशील सामाजीक कार्यात कोरोना पुनर्वसन समितीचे तालुकानिहाय समन्वयक अशोक कुटे सर (नेवासा) संगीता मालकर,(कोपरगाव) कारभारी गरड, (नेवासा) अमोल घोलप, चंद्रकांत लबडे(शेवगाव) अनंत झेंडे(श्रीगोंदा) किसन आव्हाड(पाथर्डी) बनसोडे(नगर) मनीषा कोकाटे श्रीरामपूर, जयश्री मालुंजकर अकोले, हनीफ शेख, महेश पवार नगर, भारती इंगवले श्रीगोंदा, भारत आरगडे वाबळे मामा नेवासा, प्रमोद झावरे हे समन्वयक कार्य करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here