बिबट्याच्या हल्ल्यात तीन मेंढ्या एक कुत्रा ठार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 17, 2021

बिबट्याच्या हल्ल्यात तीन मेंढ्या एक कुत्रा ठार.

 बिबट्याच्या हल्ल्यात तीन मेंढ्या एक कुत्रा ठार.

 जेऊर परिसरात ग्रामस्थांकडून पिंजरा लावण्याची मागणी 


नगरी दवंडी /प्रतिनिधी 
अहमदनगर : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन मेंढ्या व एक कुत्रा ठार झाल्याची घटना घडली. बिबट्याच्या वावराने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर मधील चापेवाडी शिवारातील खंडोबा माळ परिसरात मेंढपाळ भिवा बिरु घुले हे आपल्या मेंढरांसह पाल ठोकुन राहत होते. सोमवार (दि १६) रात्री बिबट्याने  त्यांच्या मेंढ्या वर हल्ला करत दोन मेंढ्या ठार केल्या. भिवा घुले ह्यांनी आरडाओरडा करत बिबट्यांना हुसकावून लावले. दोन बिबटे असल्याचे घुले यांनी सांगितले. 
     बिबट्यांना हुसकावून लावण्यात आल्या नंतर पुन्हा पहाटेच्या सुमारास दोन्ही बिबट्याने पालावर हल्ला करत एक मेंढी व कुत्र्याची शिकार केली. वनविभागाचे कर्मचारी संजय सरोदे, इमामपुर सरपंच भिमराज मोकाटे, मिठु ससे, सुभाष पवार, विकास म्हस्के यांनी घटनास्थळी भेट दिली. 
      दरम्यान जेऊर परिसरात यापूर्वी बिबट्याने अनेक वेळा दर्शन दिलेले आहे. बिबट्याच्या वावराने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment