कायनेटिक कंपनीतील सेवानिवृत्त कामगारांचा प्रश्न शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 14, 2021

कायनेटिक कंपनीतील सेवानिवृत्त कामगारांचा प्रश्न शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला..

 कायनेटिक कंपनीतील सेवानिवृत्त कामगारांचा प्रश्न शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला..

ग्रॅज्युएटीची 1 कोटींची रक्कम कामगारांना मिळाली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरच्या कायनेटिक कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेने कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविले. आताही त्यांच्या ग्रॅज्युएटीबाबत व्यवस्थानाने चलढकलपणा केल्याने कामगार गेल्या 10 दिवसांपासून उपोषणास बसले होते. शिवसेना पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेऊन व्यवस्थापनासमवेत चर्चा करुन या कामगारांच्या ग्रॅज्युएटीचा प्रश्न मार्गी लावला आहे. कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून दिले आहेत. कामगारांच्या प्रश्नांसाठी शिवसेना नेहमीच त्यांच्या पाठिशी उभी राहिल, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
यावेळी सातपुते म्हणले की सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. प्रसंगी सेना स्टाईल आंदोलन करुन ते सोडविलेही आहेत. नगरमध्ये माजी मंत्री स्व.अनिल राठोड यांनी नेहमीच जनतेच्या कामांना प्राधान्य दिले, आक्रमकपणे त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या.
कायनेटिक कंपनीमधील सेवानिवृत्त कामगारांची हक्काची ग्रॅज्युएटीची रक्कम शिवसेनेच्या पुढाकाराने कामगारांना वितरित करण्यात आली. यावेळी विक्रम राठोड म्हणाले, शिवसेनेने कामगारांचे हित जोपासून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहे. त्यामुळे कामगारांचे जीवनमानही उचंवण्यास मदत झाली आहे. कायनेटिक कंपनीबाबत कामगार व व्यवस्थापनामध्ये वाद निर्माण झाल्यास शिवसेनेने मध्यस्थी करुन तो मिटविला आहे. कंपनी आणि कामगारांच्या हिताचे निर्णयास पाठिंबा दिला आहे. आताही कामगारांच्या गॅ्रज्युएटीच्या प्रश्नात पुढाकार घेऊन कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करुन हाही प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे हक्काचे पैसे कामगारांना मिळाल्याचे समाधान आहे.
संजय मुनोत म्हणाले, कायनेटिक कंपनीतील आम्ही कामगार गेल्या 4-5 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालो, सेवा कालावधीतील आमची हक्काची ग्रॅज्युएटीची रक्कम कंपनीकडे वारंवार मागणी करुनही मिळत नव्हती. याबाबत वेळोवेळी कंपनी व्यवस्थापन व प्रशासनास अर्ज, निवेदने दिली, परंतु त्यावर काहीही निर्णय होत नव्हता. नाईलाजाने उपोषणास बसावे लागले, त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी याबाबत आक्रमक भुमिक़ा घेऊन व्यवस्थापनाशी चर्चा करुन हा प्रश्न सोडविला. त्यामुळे कामगारांना हक्काचे पैसे मिळाले, याबद्दल आम्ही शिवसेना पदाधिकारी व कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानतो, असे सांगितले.
यावेळी शिवसेनेच्यावतीने कंपनीचे एम.डी.अजिंक्य फिरोदिया यांचे आभार मानले.  यावेळी बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर यांनी मनोगत व्यक्त केले. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या ग्रॅज्युएटीचे दिलेल्या चेकचे वितरण संबंधित कामगारांना करण्यात आले. चेक मिळाल्याने अनेक कामगार भावूक होऊन शिवसेना पदाधिकार्यांचे आभार मानले.याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, संतोष गेनप्पा, संग्राम कोतकर, एस.बी.मुनोत, यशवंत फुलसौंदर, सुभाष बागुल, सतीश परभणे, सुरेश पानमळकर ,जे.डी.चौधरी, आय.यु.शेख, बी.आर.बाराहाते, रामदास खेडेकर, ए.पी.मनीकंदन, बी.बी.कडूस, बी.के.शिंदे, सी.एम. गुलदगड, ए.आर.मतकर, एम.ए.सय्यद, पी.के.बडे, जे.व्ही. मतकरी, एस.आर.कुलकर्णी, डी.जी.दुसाने, एस.टी.हिंगे, एम.डी. राजापुरे, के.एम.पठारे, जी.एम.जाधव, आर.बी.कोल्हे, आर.एम.बहिरवडे, ए.के.वावरे, आर.बी.संभार, बी.के.पाटील आदि कामगार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment