दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक तीन पोलीस कर्मचार्‍यांची निलंबनातून तात्पुरती मुक्तता. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 14, 2021

दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक तीन पोलीस कर्मचार्‍यांची निलंबनातून तात्पुरती मुक्तता.

 दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक तीन पोलीस कर्मचार्‍यांची निलंबनातून तात्पुरती मुक्तता.

अहमदनगर- जिल्हा पोलिस दलातील निलंबित असणार्‍या सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सिंग राजपूत, सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस हवालदार संतोष वाघ, हवालदार शिवनाथ बडे, पोलीस नाईक रामदास सोनवणे यांचे निलंबनातून तात्पुरती मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत.
याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, तत्कालिन नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांना 16 फेब्रुवारीला निलंबित केले होते. त्यांना आता राहुरी पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे. तसेच सहायक निरीक्षक दिलीप राठोड यांना 13 एप्रिल रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांना आता कर्जत पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे. तसेच निलंबित झालेले पोलीस हवालदार संतोष वाघ यांना पोलीस मुख्यालय, पोलीस हवालदार शिवनाथ बडे यांना पारनेर पोलीस ठाण्यात व पोलीस नाईक रामदास सोनवणे यांना पाथर्डी पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे. निलंबनातुन करण्यात आलेली मुक्तता ही पुर्णत: तात्पुरत्या स्वरूपाची असून भविष्यात त्यांच्या विरूद्ध करण्यात येणार्या कारवाईस कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान हे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहेत.

No comments:

Post a Comment