पोलीस उपनिरीक्षक नवनाथ ढवळेंंना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 14, 2021

पोलीस उपनिरीक्षक नवनाथ ढवळेंंना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर.

 पोलीस उपनिरीक्षक नवनाथ ढवळेंंना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर.


अहमदनगर -
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील सध्या गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपविभागीय पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना नवनाथ ढवळे यांनी 2015 -17 या काळात धानोरा उपविभागीय चातगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी हिचा खात्मा केल्याबद्दल राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले आहे.
उसेंडी हिच्यावर 139 गुन्हे दाखल होते. तिला पकडण्यासाठी 16 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. ही चकमक तब्बल बाला तास सुरु होती. श्री. ढवळे आणि त्यांच्या सहकार्यांनी जीवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. मुळ अहमदनगर जिल्ह्यातील वडजिरे गावातील असलेल्या ढवळे यांनी कर्‍हाडलाही उत्तम कामगिरी केली होती. त्यानंतर चिपळूणला पोलीस उपाधिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे पोलीस उपाधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment