श्रीजीं इंजिनीरिंग ग्रुप तर्फे रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ आनंदऋषीजी हॉस्पिटलला आम्ब्युलन्सची देणगी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 18, 2021

श्रीजीं इंजिनीरिंग ग्रुप तर्फे रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ आनंदऋषीजी हॉस्पिटलला आम्ब्युलन्सची देणगी

 श्रीजीं इंजिनीरिंग ग्रुप तर्फे रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ आनंदऋषीजी हॉस्पिटलला आम्ब्युलन्सची देणगी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरच्या नागापूर औद्योगिक वसाहतीतील प्रतिथयश उद्योजक श्रीजीं इंजिनीरिंग ग्रुपच्या वतीने श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलला नुकतीच एक आम्ब्युलन्सची देणगी देण्यात आली. श्रीजीचे संचालक दिनेशजी अग्रवाल यांचे पिताश्री स्वर्गीय रमेशचंद्रजी अग्रवाल यांच्या स्मरणार्थ हि देणगी देण्यात आली. यावेळी श्री जीचे संचालक दिनेशजी अग्रवाल, अनिल अग्रवाल, सुदीप अग्रवाल व सागर अग्रवाल तसेच उपमहापौर गणेशजी भोसले, कैलास पाटील, सुभाष यादव, किरणकुमार, राजेंद्र सुलाखे, जैन सोशल फेडरेशनचे सदस्य संतोष बोथरा, सतीश लोढा, माणकचंद कटारिया, कुंदन कांकरिया वैधकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी उपस्थित होते. आम्ब्युलन्सची दिनेश अग्रवाल यांच्या हस्ते पूजा करून व नारळ वाढवून हि आम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या सेवेत दाखल करून घेण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरवातीला संतोष बोथरा यांनी स्वागत करून हॉस्पिटलच्या सेवा कार्याविषयी माहिती दिली.या हॉस्पिटल मध्ये दवा-व दुवा याची सांगड असून जैनाचार्य आनंदऋषीजींचे आशीर्वाद व प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी महाराजांची प्रेरणा व मार्गदर्शन असून सेवाभावी कार्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींचे  योगदान लाभत आहे.ना नफा ना तोटा या तत्वावर हे सेवा कार्य सुरु असून अत्याधुनिक मशीनरीनें युक्त असे हे हॉस्पिटल चांगल्या रुग्ण सेवेसाठी संपूर्ण राज्यात परिचित आहे. असे सांगून अग्रवाल परिवाराचे आभार मानले.
श्रीजी ग्रुपचे युवा संचालक सुदीप अग्रवाल म्हणाले कि श्रीआनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्याविषयी जनमानसात चांगली प्रतिमा आहे.याचा सर्व अभ्यास करूनच आम्ही या हॉस्पिटलच्या रुग्ण सेवा कार्यात आणखीन भर पडावी यासाठी आम्ब्युलन्सची देणगी देत आहोत हे आम्ही आमचे भाग्य समजतो.निश्चितच सर्वसामान्याना याचा लाभ मिळेल अशी आशा व्यक्त केली व हॉस्पिटल पुढील कार्यासाठी सुयश चिंतले यानंतर दिनेश अग्रवालव परिवाराने हॉस्पिटलमधील विविध विभागाची पाहणी केली. उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन दानशूर उद्योजक दिनेशजी अग्रवाल व परिवाराचा यावेळी सन्मान करण्यात आला.श्री भोसले यांनी देखील समयोसुचित भाषण करून या हॉस्पिटलच्या कार्यास शुभेच्छा दिल्या व अग्रवाल परिवाराचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here