मनेष साठे यांची भाजपा अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 18, 2021

मनेष साठे यांची भाजपा अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती

 मनेष साठे यांची भाजपा अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनेष साठे हे भाजपचे अनेक वर्षांपासून पक्षाचे एकनिष्ठा कार्यकर्ते आहे. त्यांनी विविध पदाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. त्याच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्यासाठी अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या आहे या योजना शेवटच्या घटका पर्यत पोहचविण्याचे काम मानेष साठे करतील त्यांच्या कामाचा अनुभवाचा उपयोग समाजासाठी नक्कीच होईल असे मत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष व मा.आमदार सुधाकर भालेराव यांनी व्यक्त केले.
मनेष साठे यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली त्याना नियुक्तीचे पत्र देताना प्रदेशाध्यक्ष मा.आमदार सुधाकर भालेराव समवेत प्रदेश चिटणीस मनोज पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मनेष साठे म्हणाले की, भाजप पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी टाकली आहे ती सक्षम पणे पार पाडेल, पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळा पर्यत घेऊन जाऊन पक्षवाढीसाठी मी काम करेल तसेच शासनाच्या विविध योजना अनुसूचित जाती जमातीसाठी असुन त्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करून जनजागृती करेल,पक्षाने दिलेल्या संधीचा उपयोग कामाच्या माध्यमातून नक्कीच सार्थ करेल असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here