मोहरमच्या सातवी निमित्त सर्जेपुरा येथे खिचडा भंडार्‍याचे आयोजन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 18, 2021

मोहरमच्या सातवी निमित्त सर्जेपुरा येथे खिचडा भंडार्‍याचे आयोजन.

 अन्नदानाचा उपक्रम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक - रशीद खान.  

मोहरमच्या सातवी निमित्त सर्जेपुरा येथे खिचडा भंडार्‍याचे आयोजन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी ः
अहमदनगर - समाजातील गरजू व वंचित घटकासाठी अन्नदानाचा उपक्रम घेवून सर्जेपुरा सोशल क्लबच्या वतीने सामाजिक सौहार्द व राष्ट्रीय एकात्मता निर्माण केल्याचे प्रतिपादन रशीद खान यांनी केले. तसेच सर्वधर्मीय बांधवांकरीता दरवर्षी होणार्‍या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. मोहरम निमित्त सर्जेपुरा सोशल क्लबच्या वतीने मोहरमच्या सातवी निमित्त खिचडा भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रशीद खान बोलत होते. याप्रसंगी रशीद खान हाजी फकीर मोहम्मद, युसूफ खान (राजू शेठ), आसिफ खान, अली खान, सलमान खान, मदर शेख, रिजवान इनामदार, गुड्डू मुलांनी, मोसिन शेख, आसिफ दगडू, अकिब शेख, उसामा शेख, तबरेज पटेल, सोफियान पटेल, अरबाज सय्यद आदि उपस्थित होते. युसूफ खान (राजू शेठ) यांनी मोहरमचे महत्त्व विशद केले. व कोरोना चे सर्व नियम पाळून खिचडा भंडार्‍याचे पार्सल सुविधा प्रमाणे वाटप करण्यात आले व युवकांना धार्मिक एकतेवर प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here