हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान ः किरण काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 3, 2021

हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान ः किरण काळे

 हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान ः किरण काळे

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नाव बदलले ः अडाणींच्या पुतळ्याला जोडे मार आंदोलन.. शहर काँग्रेस आक्रमक..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मुंबईतील सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे व्यवस्थापन जेव्हीके कंपनीकडून जुलै महिन्यामध्ये अदाणी कंपनीकडे आले आहे. अदाणी कंपनीने सुमारे 74 टक्के भाग घेतला आहे. अदाणी कंपनीने व्यवस्थापनाचा ताबा घेताच विमानतळ परिसरामध्ये असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच अदाणी एअरपोर्ट असे फलक लावले होते. हे फलक मुंबईत आंदोलकांनी काल उखडून काढले. याचे तीव्र पडसाद नगर शहरात देखील उमटले आहेत. शहर जिल्हा काँग्रेसने या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असल्याचे म्हणत महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्च स्थानी असून केंद्रातील मोदी सरकार आणि मोदी सरकारच्या आशीर्वादाने अदाणी उद्योगपतीने केलेला हा किळसवाणा घृणास्पद प्रकार असल्याचा आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नाव बदलून अदाणी एअरपोर्ट केल्याच्या प्रकरणाची नगर शहरामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली इम्पेरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मोदी सरकार मुर्दाबाद, अदाणी उद्योगपती मुर्दाबाद, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. यावेळी मोदी, अदाणी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले.  शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे प्रदेश काँग्रेसच्या बैठकीसाठी मुंबईत आहेत. मुंबईतून फोनवर प्रतिक्रिया देताना काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. मनुवादी भाजपाच्या मोदी सरकारची ही विकृत मानसिकता आहे. यांना केवळ निवडणुकीपुरता छत्रपतिंचा आशिर्वाद पाहिजे असतो. काँग्रेसने उभा केलेला देश विकण्याचे काम मोदी सरकारचे सुरू असून आता तर त्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नाव अदाणी एअरपोर्ट करून मराठी माणसांच्या आणि देशातील लोकांच्या भावनांना दुखविल्या आहेत. त्याचा काँग्रेसच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
यावेळी झालेल्या आंदोलनामध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुजित जगताप, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, ऋतिक लद्दे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, इंटक जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ शेख, महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, सुमन कालापहाड, सेवादल महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, विद्यार्थी काँग्रेसचे मयूर घोरपडे, वैभव कांबळे, सागर दळवी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment